एक्स्प्लोर

Death Threat To Bollywood Stars : सलमान खान एकटाच नाही! ‘या’ कलाकारांनाही मिळाल्या होत्या जीवे मारण्याच्या धमक्या

Death Threat To Bollywood Stars : जीवे मारण्याची धमकी मिळणार सलमान खान हा एकमेव बॉलिवूड कलाकार नाही. या आधीही अनेक कलाकारांना अशाच जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

Salman Khan : संगीतकार सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्या हत्येनंतर सलमान खानची (Salman Khan) सुरक्षा वाढवण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी होता. त्यामुळे सलमानच्या जीवालाही धोका असल्याचे सांगण्यात आले होते. सिद्धूच्या हत्येनंतर सहा दिवसांनी सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. सलमान खानचे वडील सलीम खान हे रविवारी सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता, त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले होते. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी आता सलमान खांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मात्र, अशी जीवे मारण्याची धमकी मिळणार सलमान खान हा एकमेव बॉलिवूड कलाकार नाही. या आधीही अनेक कलाकारांना अशाच जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

राकेश रोशन : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन यांना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यांच्यावर एकदा हल्लाही झाला होता. राकेश रोशन यांना खंडणीसाठी गँगस्टर अबू सालेमचे धमकीचे फोन यायचे. 'कहो ना प्यार है'च्या कमाईतून अंडरवर्ल्डने हिस्सा मागितला होता, जो राकेश रोशनने देण्यास नकार दिला होता. यानंतर अबू सालेमच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

आमिर खान : आमिर खानचा ‘सत्यमेव जयते’ हा शो चांगलाच गाजला होता. या शोमधून त्याने अनेक सत्य समोर आणली. आमिर खानला या शोसाठी धमक्या आल्या होत्या. त्यानंतर अभिनेत्याने स्वत:साठी बुलेट प्रूफ कार घेतली.

कंगना रनौत : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत हिला देखील अशाच धमक्या देण्यात आल्या होत्या. 2007मध्ये कंगनाची बहिण रांगोली चंदेलवर एका मुलाने अॅसिड फेकले होते. यानंतर कंगनाने या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी अभिनेत्रीला सतत धमकावण्यात येत होते.

महेश भट्ट : अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचे वडील-दिग्दर्शक महेश भट्ट यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. 2015मध्ये डी गँगने निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर 2017 मध्येही महेश भट्ट यांच्याकडून 50 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. 

शाहरुख खान : शाहरुख खानलाही अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या होत्या. गँगस्टर छोटा राजनसोबत रवी पुजारीनेही त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 2014मध्ये त्याच्या 'हॅपी न्यू इयर' चित्रपटाच्या सेटवर एक नोट सापडली होती, ज्यामध्ये शाहरुखला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

Salman Khan Death Threat: सलमान खान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Salman Khan : धमकीचं पत्र मिळाल्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, मुंबई पोलीस करणार तपास

महत्त्वाच्या बातम्या

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Shatrugan Sinha on Sonakshi Sinha: वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget