De Dhakka 2 : 'काय झाडी, काय डोंगर...' डायलॉग नेमका कोणाचा? 'दे-धक्का-2' चे कलाकार म्हणाले आमचाच, तर शहाजीबापू म्हणतात....
De Dhakka 2 : 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटील' हा डायलॉग नेमका कोणाचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
De Dhakka 2 : शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांचा 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटील' हा डायलॉग चांगलाच फेमस झाला. या डायलॉगवर गाणं देखील तयार करण्यात आलं. सोशल मीडियावर या डायलॉगचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले. आता हा डायलॉग नेमका कोणाचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण 'दे-धक्का-2' (De Dhakka 2) या चित्रपटामध्ये हाच डायलॉग वापरला असून या चित्रपटातील कलाकारांनी दावा केला आहे की, हा डायलॉग शहाजीबापूंच्या आधी त्यांनी चित्रपटामध्ये वापरला आहे.
शहाजीबापूंचा डायलॉग महेश मांजरेकरांनी चित्रपटात वापरला का?
'दे-धक्का-2' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटील' हा डायलॉग ऐकू येतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे मत आहे की, त्यांच्या या चित्रपटात अधीच तो डायलॉग होता आणि शहाजीबापूंनी त्यांच्या हा हायलॉग ऐकून वापरला. त्यांच्यासोबतच चित्रपटातील कलाकारांनी देखील हाच दावा केला आहे.
अभिनेते शिवाजी साटम यांचा दावा
चित्रपटामधील तात्या ही भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम यांनी सांगितलं की, 'डायलॉग अचानक अॅड झालेला नाही. आम्ही शूट करत असलेलं लंडनमधील लोकेशन तसं होतं. त्यामुळे स्क्रीप्टच्या गरजेनुसार तो आगोदरच घेतलेला डायलॉग आहे. नीट बघा माझं कॅरेक्टरही तसंच ग्रामीण भागातलं आहे. त्यामुळे आपसूकच तो संवाद तोंडातून आणि मनातून बाहेर येतो.'
शहाजीबापू प्रतिक्रिया
चित्रपटात वापरण्यात आलेल्या डायलॉगबाबत शाहाजीबापू म्हणतात, 'माझा डायलॉग त्यांनी वापरला आहे. त्यांना तो लंडनमध्ये सुचला हे शंभर टक्के खोटं आहे. त्यांनी तो डायलॉग चित्रपटामध्ये वापरला, त्यांच्यावर मी कोणतीही तक्रार करणार नाही.'
‘दे धक्का’ हा चित्रपट 2008 साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज झाला आहे. ‘दे धक्का-2 ’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
वाचा इतर बातम्या:
De Dhakka 2 Trailer : 'काय झाडी, काय हाटेल, ओक्केमध्ये एकदम...'; ‘दे धक्का 2’चा भन्नाट ट्रेलर रिलीज