एक्स्प्लोर
'दंगल' फेम जायरा वसीम वादात, सोशल मीडियावरुन माफीनामा
नवी दिल्ली: सुपरस्टार आमीर खानच्या दंगल या सिनेमात लहान गीता फोगाटची भूमिका साकारणाऱ्या जायरा वासीमने नुकतीच जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. यानंतर तिला सोशल मीडियातून ट्रोल करण्यात आलं. मात्र, यावर तिने आपल्या वर्तणुकीवर सोशल मीडियातूनच जाहीर माफी मागितली. पण हा माफीनामा तिने मात्र तीनच तासात सोशल मीडियातून हटवला आहे. त्यामुळे आधी माफीनामा आणि नंतर माघारीमागचे गूढ उलगडले नाही.
जायरा आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या भेटीवर सोशल मीडियातील तसंच काश्मीर खोऱ्यातील कट्टरपंथींचा मोठा वर्ग जायरावर नाराज झाला होता. तिच्यावर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच जायरानेही सोशल मीडियावरुन जाहीर माफी मागितली. मात्र, तिने हा माफीनामा अवघ्या 3 तासातच आपल्या फेसबुक प्रोफाईलवरुन हटवल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जायराने फेसबुक पोस्टमधील आपल्या माफीनाम्यामध्ये, ''मी नुकतीच ज्यांना भेटले, त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर मी ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांची जाहीर माफी मागते. मात्र, अनेकवेळा परिस्थितीच्या मागे कुणाचेच काही चालत नाही, हे समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त करते,'' असं लिहिलं आहे.
ती पुढे म्हणाली की, ''मी 16 वर्षीय असल्याने, हे समजून माझ्यासोबत तसाच व्यवहार करावा. मी जे काही केले, त्यावर मी सर्वांची माफी मागते. कारण माझ्याकडून अनावधानाने चूक घडली. मला सर्वजण माफ करतील अशी अपेक्षा व्यक्त करते.''
विशेष म्हणजे, तिने आपल्या माफीनाम्यामध्ये काश्मीरी जनतेने तिला रोल मॉडेल समजू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. कारण इतिहासात अनेक रोल मॉडेल आहेत, त्यामुळे मला त्यांच्या पंगतीत नेऊन बसवणे त्यांचा अपमान ठरेल. तसेच आपल्याला नवा कोणताही वाद उपस्थित करायचा नसल्याचं तिने यावेळी सांगितलं आहे. तसंच ती जे काही करत आहे, त्यावर तिला अभिमान नसल्याचेही नमूद केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement