Germany: जर्मनीतील ‘आयटीबी बर्लिन’ मेळाव्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन; करिश्मा वाबळे सादर केली लावणी
‘आयटीबी बर्लिन’ व्यापार मेळाव्यामध्ये जवळपास 161 देश तसेच 10,000 पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला.
Germany: जर्मनीमध्ये (Germany) दरवर्षी ‘आयटीबी बर्लिन’ (ITB Berlin) व्यापार मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदाही जर्मनीत (Germany) आयटीबी बर्लिन 2023 तर्फे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगाला जागतिक पातळीवर चालना देण्यासाठी प्रतिष्ठित ‘आयटीबी बर्लिन’ व्यापार मेळाव्यात राज्याच्या पर्यटन विभागाने सहभाग घेतला होता. यावर्षी ‘आयटीबी बर्लिन’ व्यापार मेळाव्यामध्ये जवळपास 161 देश तसेच 10,000 पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला. त्याठिकाणी वैभवशाली संस्कृती, समृद्ध इतिहास, निळे समुद्रकिनारे असलेल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये सर्वांसमोर मांडण्यात आली.
आयटीबी बर्लिन ‘एमटीडीसी’ चा ‘महाराष्ट्र पर्यटन स्टॉल’ संपूर्ण आयटीबीचा केंद्रबिंदू राहिला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनुभव घेता यावा यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील पारंपारिक नृत्यप्रकार, लावणी या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले.
आयटीबी बर्लिन 2023 व्यापार मेळा या कार्यक्रमाचे आयोजन स्टारक्राफ्ट एंटरटेनमेंट प्रा.लि. चे संचालक श्री संतोष मिजगर यांनी केले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड पार्क, वीणा वर्ल्ड, स्वदेश ट्रॅव्हल्स, कॅप्टन नीलेश गायकवाड, डेक्कन ओडिसी, गोवर्धन इको व्हिलेज हे सह-प्रदर्शक म्हणून सहभागी झाले होते.
आयटीबी बर्लिन 2023 या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री लावणीसम्राज्ञी करिश्मा वाबळे हिने लावणी सादर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले.करिश्मा वाबळेनं सोशल मीडियावर जर्मनीमधील काही फोटो देखील शेअर केले आहेत.
View this post on Instagram
करिश्मा वाबळेनं ही अभिनेत्री आणि डान्सर आहे. ती सोशल मीडियावर तिच्या डान्सचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. करिश्मा वाबळेला इन्स्टाग्रामवर 34 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या: