कुली नंबर 1, छलांग, दुर्गावती येणार अॅमेझॉन प्राईमवर; सर्व चित्रपटांच्या तारखाही ठरल्या
कोरोना महामारीमुळे चित्रपटगृह बंद झाल्यानंतर निर्मात्यांना ओटीटीचा (OTT) आधार वाटू लागला आहे. आता कुली नंबर 1, छलांग आणि दुर्गावती हे चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर येणार आहेत.
लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद झाल्यानंतर सिनेमावाल्यांना ओटीटीचा आधार वाटू लागला. अनेक सिनेमे ओटीटीवर आले. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो गुलाबो सिताबो, शकुंतला देवी, दिल बेचारा, सडक 2 या चित्रपटांचा. पण त्याला रसिकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. परिणामी ओटीटी व्यासपिठांनीही जरा सबुरीनं घ्यायचं ठरवलं. बघता बघता वर्षं संपत आलं. असं असताना आपल्या पोतडीतले काही सिनेमे बाहेर काढायचं अॅमेझॉन प्राईमने ठरवलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुली नंबर 1 या डेव्हिड धवन दिग्दर्शित चित्रपटाची चर्चा होती. दिग्दर्शकाला वाटत होतं हा सिनेमा ओटीटीवर यावा. तर त्यांचे चिरंजीव आणि चित्रपटातले नायक वरून धवन याला मात्र हा सिनेमा इतक्यात ओटीटीवर येऊ नये असं वाटत होतं. यावरून जरा मतभेदही झाले होते दोघांत. पण अखेर हा चित्रपट ओटीटीवर येतो आहे. एमेऑन प्राइमने हा चित्रपट घेतला असून तो येणार आहे 25 डिसेंबरला. सिनेमा ओटीटीवर येणार पण तो अडीच महिन्यांनंतर असा मध्यममार्ग यात काढण्यात आला आहे. या चित्रपटात वरूणसह सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.
असं असेल तर माझे सिनेमे बघू नका, मल्लिका शेरावतचं ट्रोलर्सना उत्तर
या चित्रपटासोबत भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेला दुर्गावती हा चित्रपटही याच ओटीटीने घेतला असून तो चित्रपट 11 डिसेंबरला रिलीज करायचं ठरलं आहे. तर छलांग हा राजकुमार राव आणि नुश्रत भरुचा यांचा चित्रपट 13 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. हे तीन महत्वाचे चित्रपट तर अॅमेझॉन प्राईमकडे आहेतच. शिवाय काही प्रादेशिक चित्रपटही ते प्रदर्शित करणार आहेत. यात मळ्याळम, तेलुगु चित्रपटांचा समावेश होतो. एकिकडे लॉकडाऊन संपत असताना ओटीटीवर पुन्हा सिनेमे आणणं ही रिस्क असल्याचं काहींना वाटतं. पण त्याचवेळी अनलॉकिंकमध्ये थिएटर्सना परवानगी मिळाली तरी ती अटी शर्तींसह असणार आहे. शिवाय कोरोनाचं सावट गेलेलं नाही. त्यामुळे लोक बाहेर पडतील की नाही याबाबत शंका आहे. असं असताना सिनेमा ओटीटीवर येणं चांगलं आहे असं मानणाराही वर्ग आहे.
Drug Case | अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर, पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर जाण्यास मनाई