एक्स्प्लोर
कपिलच्या शो मध्ये एकदाही न गेलेले कलाकार!
मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माचा शो हा नव्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी महत्त्वाचा मंच आहे. किंग खान शाहरुखपासून ते महानायक अमिताभ बच्चनपर्यंत बहुतेक सर्वांनी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली आहे.
मात्र एक अभिनेता या मंचावर एकदाही हजर राहिला नाही, त्याचं नाव आहे मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान.
कपिलचा पूर्वीचा शो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल', आणि सध्याचा 'द कपिल शर्मा शो'मध्ये सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, ऐश्वर्या राय, काजोल, अनुष्का शर्मा यासारख्या दिग्गजांनी हजेरी लावली.
प्रत्येकाने आपापले सिनेमे प्रमोट करण्याच्या निमित्ताने कपिलच्या शोमध्ये सहभाग घेतला. मात्र आमीर खानने एकाही सिनेमाचं प्रमोशन कपिलच्या मंचावरुन केलं नाही.
कपिल शर्मा 2013 पासून कॉमेडी शो करत आहे. तेव्हापासून आजपर्यंत आमीरचे तीन सिनेमे रिलीज झाले. यामध्ये धूम3 (2013), पीके (2014), आणि आताचा दंगल (2016) या सिनेमांचा समावेश आहे. मात्र यापैकी एकाही सिनेमाचा प्रमोशन आमीरने कपिलच्या शोमध्ये केलं नाही.
आमीरशिवाय अन्य काही चेहरे आहेत, ज्यांनी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावलेली नाही.
रजनीकांत
यामध्ये टॉलिवूड अभिनेता रजनीकांत यांचा समावेश आहे. रजनीकांत यांचे 2013 पासून तीन सिनेमे रिलीज झाले आहेत. यामध्ये 'कबाली' (2016), 'लिंगा' (2014) आणि 'कोचडयान' (2014) यांचा समावेश आहे.
संजय दत्त
कपिलचा शो सुरु झाल्यानंतर अभिनेता संजय दत्तचे 4 सिनेमे रिलीज झाले आहेत. यामध्ये गाजलेल्या 'पीके'चा समावेश आहे. मात्र संजय दत्तही कपिलच्या मंचावर गेला नाही.
श्रीदेवी
कपिलच्या मंचावर न आलेल्या यादीत अभिनेत्री श्रीदेवीचाही समावेश आहे. मात्र 2013 पासून श्रीदेवीचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. त्यामुळे श्रीदेवीला तशी संधीच मिळालेली नाही. यंदा तिचा मॉम हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने श्रीदेव कपिलच्या मंचावर हजेरी लावते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
नाना पाटेकर
2015 मध्ये नाना पाटेकरचे दोन सिनेमे रिलीज झाले. यामध्ये 'अब तक 56', आणि 'वेलकम बॅक' रिलीज झाला होता. वेलकम बॅकच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर आणि जॉन अब्राहम कपिलच्या शोमध्ये आले होते, मात्र नाना पाटेकरने हजेरी लावली नव्हती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement