एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन
फ्युजन डान्स अकॅडमीच्या वतीने एक दिवसाच्या डान्स प्रशिक्षण शिबिरानिमित्त त्या सांगलीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केलं.
सांगली : बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी चित्रपटसृष्टीमध्ये होणाऱ्या कास्टिंग काऊचचं समर्थन केलं आहे. "फिल्म इंडस्ट्री कोणत्याही मुलीवर बलात्कार करुन सोडून देत नाही, तर त्यांना काम आणि रोटी पण देते," असं त्या म्हणाल्या.
फ्युजन डान्स अकॅडमीच्या वतीने एक दिवसाच्या डान्स प्रशिक्षण शिबिरानिमित्त त्या सांगलीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केलं.
काय म्हणाल्या सरोज खान?
“हे प्रकार तर बाबाआदमच्या जमान्यापासून सुरु आहेत. कोणी ना कोणी प्रत्येक मुलीवर हात साफ करण्याचा प्रयत्न करतं. सरकारी खात्यातील लोकही करतात. मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या मागे का लागला आहात? ती किमान रोटी तरी देते, बलात्कार करुन सोडून देत नाही हे मुलीवर आहे की, तिला काय करायचंय. तिला त्याच्या हाती लागायचं नाही तर नाही येणार. तिच्याकडे कला आहे तर तिने स्वत:ला का विकावं? फिल्म इंडस्ट्रीला काही बोलू नका, ती आमची आई-बाप आहे.”सरोज खान यांचा माफीनामा दरम्यान, आपल्या या विधानावर सरोज खान यांनी माफीही मागितली आहे. मला खेद आहे, मी माफी मागते, असं त्यांनी म्हटलं. दक्षिण भारतातील स्ट्रगलर अभिनेत्री श्री रेड्डीच्या आरोपांनंतर भारताच्या फिल्म इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचवर जोरदार चर्चा रंगली आहे. त्यानंतर बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनीही त्यांच्यासोबत कास्टिंग काऊच झाल्याचं सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement