एक्स्प्लोर
'दंगल' आवडला, चीनच्या राष्ट्रपतींची मोदींकडे प्रतिक्रिया
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शांघाय सहयोग संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी कझाकस्तानच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली.
या भेटीमध्ये दोन्ही देशातील संबंध आणि व्यापारावर महत्त्वाची चर्चा करण्यात आली. या शिवाय दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक सहयोग वाढवण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
‘दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक सहयोगाबाबतही सविस्तर चर्चा झाली. यावेळी शी जिनपींग यांनी दंगल सिनेमा चीनमध्ये चांगली कमाई करत असल्याचं सांगितलं. त्यांनी स्वतः हा सिनेमा पाहिला आणि तो त्यांना आवडला,' अशी माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली.
भारत शांघाय सहयोग संघटनेचा औपचारिकपणे सदस्य बनला आहे. भारताव्यतिरीक्त पाकिस्तानलाही आज एससीओची सदस्यता मिळाली आहे. याआधी चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिजस्तान, उज्बेकिस्तान आणि ताजिकिस्तान या संघटनेचे सदस्य होते.
सुपरस्टार आमिर खानचा दंगल सिनेमा भारतासह जगभरात विक्रमी कमाई केल्यानंतर चीनमध्येही रिलीज करण्यात आला आहे. चीनमध्येही या सिनेमाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement