Chandramukhi : 'चंद्रमुखी' फेम अमृता खानविलकरने घेतले ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन; शेअर केला व्हिडीओ
Chandramukhi : अमृता खानविलकरने अक्कलकोटमधील 'श्री स्वामी समर्थ' आणि तुळजापूरमधील 'तुळजाभवानी देवी'चे दर्शन घेतले आहे.
Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) अनेक मराठी-हिंदी सिनेमे, मालिका आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या अमृता 'चंद्रमुखी' (Chandramukhi) सिनेमामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमाने चांगली कमाई केल्याने अमृताने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले आहे.
अमृता खानविलकरने 'चंद्रमुखी' सिनेमाच चंद्रा ही भूमिका साकारली आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने अमृताने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले आहे. अमृताने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अमृताने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमृताने व्हिडीओ शेअर करत खास कॅप्शनदेखील लिहिले आहे. अमृताने लिहिले आहे,"लहानपणापासून वर्षातून एकदा अक्कलकोट आणि तुळजापूरला यायची सवय आहे... स्वामींनी आणि आईनं खूप दिलं आहे. चंद्रमुखी प्रदर्शित झाला... प्रमोशनच्या गडबडीत राहून गेलं होतं … आज फक्त आभार मानायला आले. बास बाकी काहीच नाही." व्हिडीओमध्ये अमृता देवदर्शन करताना दिसत आहे.
View this post on Instagram
'चंद्रमुखी' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.21 कोटींची कमाई केली होती. जागतिक पातळीवरदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 'चंद्रमुखी' सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील दिग्गजांनीदेखील कौतुक केले आहे.
राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या 'चंद्रा'ची प्रेमकहाणी 'चंद्रमुखी' सिनेमात दाखवण्यात आली आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळाली आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
'चंद्रमुखी' हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कांदबरीवर आधारित आहे. सिनेमाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय - अतुल या दमदार जोडीने 'चंद्रमुखी'ला संगीत दिले आहे. अमृताने प्रेक्षकांना ढोलकीच्या तालावर, घुंगरांच्या बोलावर, साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी घायाळ केले आहे.
संबंधित बातम्या