एक्स्प्लोर

8 वर्ष मोठ्या विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात आकंठ बुडाली, लग्न केलं; आज 'या' जोडप्याची मुलगी करतेय बॉलिवूडवर राज्य; ओळखलंत का कोण?

बॉलीवूड इंडस्ट्रीत अनेक सेलिब्रिटींच्या लव्हस्टोरी चर्चेत असतात, पण तरी आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीची लव्हस्टोरी सांगत आहोत, जिच्याशी लग्न करण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शकानं चक्क धर्म बदलला होता.

Bollywood Actress Life : बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्यांची पर्सनल लाईफ प्रत्येकाच्याच आवडीचा विषय. कधी दबक्या आवाजात, तर कधी उघडपणे अनेक सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आपण बोलणार आहोत. ही अशी बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आहे, जिनं तिच्या करिअरची सुरुवात इंग्रजी चित्रपटातून केली, त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली. त्यावेळी ती देशातीलच नव्हे विदेशातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली होती. तिच्या सौंदर्यावर अनेकजण घायाळ झाले होते. अशातच एक बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक या प्रतिभावान आणि सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. हा दिग्दर्शक तिच्या प्रेमात एवढा वेडा झाला की, त्यानं आपला धर्म बदलला. दोघांनी लग्न केलं. आज ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एका बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीचे पालक आहेत. 

थ्रोबॅक पिक्चरमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण?

एका दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत, त्यापैकी एका फोटोमध्ये तिनं साडी नेसली आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये ती वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहून तुम्ही ती कोण आहे? याच विचारात असाल. त्यामुळे आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता, आम्ही तुम्हाला सांगून टाकतो ही सौंदर्यवती नेमकी आहे तरी कोण? फोटोत दिसणारी ही सौंदर्यवती दुसरी कोणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची आई आणि महेश भट्ट यांची पत्नी 'सोनी राजदान' आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

सोनीसोबत लग्न करण्यासाठी महेश भट्ट यांनी बदलला धर्म 

सोनी राजदान यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1956 रोजी बर्मिंगहॅम, इंग्लंडमध्ये झाला. जॉन फ्लॉवर या इंग्रजी थिएटर चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी 1986 च्या दूरदर्शनवरची मालिका बुनियादमध्ये सुलोचना नावाच्या महिलेची भूमिका साकारली. त्यांनी 36 चौरंगी लेन, पेज 3 आणि सडक यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे, परंतु सोनी यांच्या प्रेमकथेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

दरम्यान, सोनी राजदाननं 20 एप्रिल 1986 रोजी बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी लग्न केलं, जे त्यांच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठे होते, परंतु त्यावेळी महेश भट्ट आधीच विवाहित होते आणि त्यांनी किरण भट्ट नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं. पण, महेश भट्ट सोनी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. सोनी यांच्यासाठी त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. महेश भट्ट यांनी सोनी राजदान यांच्या लग्न करण्यासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि त्यानंतर सोनी यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली, ती मुलगी म्हणजे, आलिया भट्ट जी आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तर, महेश भट्ट यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. ती मुलगी मुलगी म्हणजे, बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेली पूजा भट्ट. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Filmstar Life : आई-वडिल 'सुपरस्टार', पण दोन्ही मुलं 'सुपरफ्लॉप'; एका मुलानं तर बुडवली 100 कोटींची फिल्म, ओळखलंत का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrirang Barne Allegations : पिंपरी चिंचवडचे पोलीस हफ्तेवसुली करतात, श्रीरंग बारणेंचा आरोपABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 December 2024 सकाळी १०  च्या हेडलाईन्सTop 90 at 9AM Superfast 25 December 2024  सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्याChristmas Special Superfast News : आज जगभरात नाताळचा जल्लोष,राज्यातही उत्साह #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत
आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी.. कष्टाचे पैसे द्या, योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Embed widget