Brahmastra : जबरदस्त अॅक्शन अन् बिग बींचा खास लूक; ब्रह्मास्त्रचा नवा टीझर रिलीज
ब्रह्मास्त्र (Brahmāstra) हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.
![Brahmastra : जबरदस्त अॅक्शन अन् बिग बींचा खास लूक; ब्रह्मास्त्रचा नवा टीझर रिलीज Brahmastra New Teaser Amitabh Bachchan Surprises All With His Sword Fighting Skills Brahmastra : जबरदस्त अॅक्शन अन् बिग बींचा खास लूक; ब्रह्मास्त्रचा नवा टीझर रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/c5735bce9335d58719e9f254a12e44221662000357761259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Brahmastra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ब्रह्मास्त्र (Brahmāstra) हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अभिनेता नागार्जुन (Nagarjuna), अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. चित्रपटाच्या ट्रेलरला गाण्यांना आणि टीझरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा नवा टीझर रिलीज झाला आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाचा निर्माता करण जोहर यानं हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
करणनं शेअर केलेला ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिताभ बच्चन हे खास लूकमध्ये दिसत आहे. तर जबदस्त अॅक्शन देखील या टीझरमध्ये दिसत आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटात अमिताभ बच्चन हे रणबीरच्या गुरुंची भूमिका साकारणार आहेत. बिग बी हे कोणासोबत तरी फायटींग करताना टीझरमध्ये दिसत आहेत.
पाहा टीझर:
View this post on Instagram
ब्रह्मास्त्र या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने दिग्दर्शन केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं केली आहे. तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच आलिया आणि रणबीरची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहे. या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)