एक्स्प्लोर

काबिल विरुद्ध रईस, पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन तगड्या सुपरस्टारची टक्कर पाहायला मिळाली. किंग खान शाहरुखचा 'रईस' आणि डान्सिंग सेन्सेशन हृतिक रोशनचा 'काबिल' हे दोन चित्रपट भिडले. मात्र बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता 'रईस'च रईस ठरण्याची चिन्हं आहेत. यामी गौतम आणि हृतिक रोशन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'काबिल' सिनेमाने पहिल्या दिवशी 10.43 कोटींची कमाई केली आहे. संजय गुप्ता यांचं दिग्दर्शन असलेला आणि राकेश रोशन यांची निर्मिती असलेला 'काबिल' सूडपटाचा प्रवास मांडतो. 25 जानेवारी म्हणजेच बुधवारी प्रदर्शित होऊनही काबिलने बऱ्यापैकी गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे रईस सारख्या तगड्या चित्रपटाची टक्कर असतानाही तो बॉक्स ऑफिसवर 'काबिल' ठरला आहे. 'काबिल'चा मल्टिप्लेक्समध्ये 40 टक्के शेअर पहिल्या दिवशी होता, तर सिंगल स्क्रीन थिएटर्समध्येही त्याचा शेअर कमी होता. दुसरीकडे शाहरुख खान, नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या रईसने पहिल्याच दिवशी छप्पर फाडके कमाई केली आहे. अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नसली, तरी रईसने पहिल्या दिवशी 21 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केल्याचं म्हटलं जातं. राहुल ढोलकियाचं दिग्दर्शन असलेला रईस क्राईम थ्रिलर आहे. https://twitter.com/_SanjayGupta/status/824503690354503680 रईस देशभरातील 2700 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ओपनिंग डे साठी रईसला 65 टक्के अॅडव्हान्स बुकिंग मिळालं होतं. म्हणजेच अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 13 कोटींचा गल्ला रईसने कमावला होता. बुधवारी हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने बुधवार ते रविवार असा पाच दिवसांचा एक्स्टेंडेड विकेंड मिळणार आहे. त्यामुळे काबिल आणि रईसच्या स्पर्धेत रईसच सरस ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget