एक्स्प्लोर
Box Office : ऋतिकच्या 'सुपर 30' ची 10 दिवसात 'सुपरकमाई'
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनचा बहुचर्चित चित्रपट 'सुपर 30' गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या 10 व्या दिवशी चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनचा बहुचर्चित चित्रपट 'सुपर 30' गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या 10 व्या दिवशी चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. ऋतिकच्या या चित्रपटाने हॉलिवूडच्या 'स्पायडरमॅन : फार फ्रॉम होम' आणि 'दी लायन किंग'ला जोरदार टक्कर दिली आहे.
'सुपर 30' ने 100 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. दुसऱ्या वीकेंडमध्ये शुक्रवारी चित्रपटाने 4.52 कोटी, शनिवारी 8.53 कोटी आणि रविवारी 11.68 कोटी रुपयांची कमाई केली.
'सुपर 30' ने पहिल्या आठवड्यात 75.85 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामध्ये दुसऱ्या वीकेंडमध्ये 24.73 कोटी रुपयांची भर पडल्यामुळे 'सुपर 30' ने 100 कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. 10 दिवसांत चित्रपटाने एकूण 100.58 कोटी रुपये कमावले आहेत.
ऋतिक रोशनने तब्बल अडीच वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आहे. सुपर 30 हा चित्रपट प्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंद कुमार यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात ऋतिकने आनंद कुमार यांची भूमिका निभावली आहे. समीक्षकांनी या चित्रपटाबाबत समीश्र समीक्षण मांडले आहे. परंतु चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
कोण आहेत सुपर 30?
सत्यघटनेवर आधारित असलेला सुपर 30 हा प्रसिद्ध गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हुशार असलेल्या परंतु गरिबीमुळे मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणित शिकवण्याचा उपक्रम त्यांनी बिहारमध्ये 'सुपर-30' या नावाने सुरु केला. या संस्थेकडून मुलांची चाचणी घेऊन त्यातून 30 जणांची निवड केली जाते व त्यांना आयआयटी प्रवेश व इतर अनेक परिक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते, याच सुपर 30 विद्यार्थ्यांच्या गुरूवर हा चित्रपट आधारित आहे. विकास बहल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.तर अनुराग कश्यप, साजिद नादियावाला, विक्रमादित्य मोटवानी हे निर्माते आहेत. ऋतिकचं दमदार कमबॅक होणारा 'सुपर 30' चित्रपट 12 जुलै 2019 रोजी रिलीज होणार आहे.
सुपर 30 च्या रिव्ह्यू : एकलव्याच्या पाठीशी उभ्या द्रोणाचार्यांची गोष्ट
#Super30 crosses ₹ ???? cr... Grabs a major chunk of market share, despite local and #Hollywood movies proving tough competitors... Biz multiplied rapidly on [second] Sat and Sun... [Week 2] Fri 4.52 cr, Sat 8.53 cr, Sun 11.68 cr. Total: ₹ 100.58 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) July 22, 2019
#Super30 remains in the same range on Day 5 [vis-à-vis Day 4]... Metros continue to fare well, while mass circuits/single screens are down... Fri 11.83 cr, Sat 18.19 cr, Sun 20.74 cr, Mon 6.92 cr, Tue 6.39 cr. Total: ₹ 64.07 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) July 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement