एक्स्प्लोर
विनयभंग प्रकरणी प्रीतीची माफी मागणार नाही, नेस वाडिया ठाम
प्रीती झिंटा केवळ मीडियाचं लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप वाडियाचे वकील आभात फोंडा यांनी केला आहे.
मुंबई : चार वर्ष जुन्या विनयभंगाच्या प्रकरणात उद्योजक नेस वाडिया आणि अभिनेत्री प्रीती झिंटा यांना हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 'जर नेस वाडिया माफी मागण्यास तयार असेल तर, आपण केस मागे घेऊ' असं बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. मात्र हे प्रकरण संपावावं, अशी इच्छा असली तरी नेस वाडिया माफी मागणार नाहीत, असं वाडियांच्या वकिलांनी हायकोर्टात सांगितलं. प्रीती झिंटा केवळ मीडियाचं लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप वाडियाचे वकील आभात फोंडा यांनी केला आहे.
आम्ही लेखी माफीची अपेक्षाच करत नाही, असं प्रीतीच्या वकिलांनी स्पष्ट केलं. 'झालं तेवढं पुरे झालं, आता हे प्रकरण समोपचारानं मिटवा', असं मत व्यक्त करत न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी पुढील सुनावणीच्या वेळी नेस वाडिया आणि प्रीती झिंटाला हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. पुढच्या मंगळवारी म्हणजे 9 ऑक्टोबरला या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या दालनात ठेवण्यात आली आहे.
अभिनेत्री प्रीती झिंटाने चार वर्षांपूर्वी उद्योजक आणि मित्र नेस वाडिया याच्याविरोधात दाखल केलेल्या विनयभंगाच्या आरोपां प्रकरणी मुंबई पोलिसांनी 200 पानी आरोपपत्र मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट इस्प्लानेड कोर्टात दाखल केलं आहे. आयपीसी कलम 354 म्हणजे हल्ला करणं, कलम 506 म्हणजे गुन्हेगारी स्वरुपाचा त्रास देणं, कलम 509 म्हणजे विनयभंग करणे या कलमांअंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
आरोपपत्र दाखल करण्यात आलं, त्यावेळी नेस कोर्टात हजर होता. त्याला 20 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आलं. त्यानंतर खटला सुरु होण्याआधीच नेस वाडियाने आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली.
30 मे 2014 रोजी किंग्स एलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरु होता. त्यावेळी आपल्याला वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये बसलेलं पाहून नेस वाडियाने तिकीटवाटपावरुन आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांदेखत शिवीगाळ केली. त्यानंतर आपण आपली जागा बदलली. पण त्याने नेसचं समाधान झालं नाही. त्याने सगळ्या टीम सदस्यांच्या देखत आपल्याला शिवीगाळ आणि असभ्य वर्तन केलं, असा आरोप प्रीतीने केला आहे. तसंच आपले हात जोरात खेचत आपल्यावर नेसने हल्ला केला, असा आरोप प्रीतीने केला होता. नेसने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
2005 ते 2010 या कालावधीत प्रीती आणि नेस एकमेकांना डेट करत होते, पण 2010 साली ते वेगळे झाले. पण त्यानंतरही त्यांची मैत्री कायम आहे. आयपीएलमधल्या किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचे संयुक्त मालक आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
भारत
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement