एक्स्प्लोर

बॉलिवूडमधील दिग्दर्शक रेमो डिसूझाला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

अजामीनपात्र वॉरंटची प्रत अद्याप मुंबई पोलीसांना मिळाली नसल्याने हायकोर्टाने रेमो डिसूझाची याचिका फेटाळून लावली आहे.

मुंबई : पाच कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटप्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीदरम्यान गाझियाबाद पोलिसांकडून अद्याप या अजामीनपात्र वॉरंटची प्रत मुंबई पोलिसांना प्राप्त झाली नसल्यामुळे हायकोर्टानं तूर्तास ही याचिका फेटाळून लावली आहे. गाझियाबादमधील राजनगरमधील सतेंद्र त्यागी यांनी रेमोवर कोटयवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करत तक्रार दिली आहे. रेमोच्या सांगण्यावरून त्यांनी साल 2013 मध्ये 'अमर मस्ड डाय' या सिनेमात पाच कोटी रुपये गुंतवले होते. चित्रपट रिलिजनंतर दुप्पट पैसे मिळवून देण्याचं आमिष रेमोने दिले होते. याबाबत रेमोकडे विचारणा केली असता रेमोने पैसे परत करण्यास नकार दिला. शिवाय त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्नही केला असे आरोप करत सतेंद्र त्यागी यांनी सिहानी गेट पोलीस ठाण्यात साल 2016 मध्ये रेमोविरोधात तक्रार दाखल केली होती. अखेर या प्रकरणी गाझियाबाद येथील दंडाधिकारी न्यायालयासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान समंन्स बजावूनही रेमो गैरहजर राहिल्यामुळे रेमोविरोधात 23 ऑक्टोबर 2019 रोजी गाझियाबाद दंडाधिकारी न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. या अटकेतून दिलासा मिळवण्यासाठी रेमो डिसूझाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुट्टीकालीन कोर्टात न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, मुंबई पोलीसांना गाझियाबाद पोलीसांकडून अद्याप वॉरंट मिळालेले नाही. त्यामुळे तूर्तास रेमोवर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकीलांनी कोर्टाला दिली त्याची दखल घेत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.

महत्त्वाच्या बातम्या

Sameer Wankhede on Kranti Redkar: 'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा
'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा
Chhaya Kadam on Ravi Jadhav: 'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
Devendra Fadnavis Dia Mirza Diwali Video Controversy: दिया मिर्झा देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत, फटकारलं नसेल, मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही : देवेंद्र फडणवीस
दिया मिर्झा देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत, फटकारलं नसेल, मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही : देवेंद्र फडणवीस
Dia Mirza Diwali Video Controversy: दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget