Bollywood Stars Fees : अक्षय कुमारने 'या' चित्रपटासाठी घेतले 135 कोटीचे मानधन, जाणून घ्या 'हे' स्टार्स चित्रपटासाठी किती फी घेतात
Bollywood Stars Fees : सर्वात महागड्या स्टार्सच्या यादीत पहिले नाव येते अभिनेता अक्षय कुमारचे (Akshay Kumar), ज्याने 'सिंड्रेला' (Cinderella) चित्रपटासाठी 135 कोटी रुपये घेतले आहेत.
Bollywood Stars Fees : चित्रपटांप्रमाणेच चाहत्यांना चित्रपटात काम करणाऱ्या स्टार्सच्या मानधनाबाबतही चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. काही अभिनेते कोटींचे मानधन घेतात तर काही स्टार्स चित्रपटाच्या नफ्यामधील वाटा घेतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे मानधन ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
या यादीत पहिले नाव आले आहे अभिनेता अक्षय कुमारचे (Akshay Kumar), त्याला बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी कुमार म्हटले जाते. अक्षय कुमार एक मोठी बातमी समोर आली आहे की, त्याने 'सिंड्रेला' (Cinderella) चित्रपटासाठी 135 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे.
या यादीत दुसरा क्रमांक आहे, सलमान खानचा (Salman Khan). सलमान खानने 2017 मध्ये आलेल्या 'टायगर जिंदा है' चित्रपटासाठी भरमसाठ मानधन घेतले होते. या मानधनामध्ये चित्रपटाच्या नफा वाटणीचाही समावेश होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'टायगर जिंदा है' या चित्रपटासाठी सलमान खानने 130 कोटी रुपये फी घेतली होती.
सर्वात महागड्या स्टार्सच्या पंक्तीत पुढचा क्रमांक मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा (Amir Khan) आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खान चित्रपटाचे मानधन म्हणून चित्रपटांच्या नफ्यात वाटा घेतो. वृत्तानुसार, आमिर चित्रपटाच्या कमाईपैकी 75 टक्के नफा स्वतःकडे ठेवतो.
याशिवाय अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) ही चित्रपटासाठी मानधन म्हणून नफ्यात वाटा उचलतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान चित्रपटाच्या कमाईपैकी 60 टक्के त्याच्याकडे ठेवतो. तसेच, आपण अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) बद्दल बोलायचे झाले तर अशी माहिती आहे की त्याने 'सुपर 30' आणि 'वॉर' या चित्रपटांच्या नफ्यातील 50 ते 55 टक्के हिस्सा घेतला.
इतर बातम्या :
- Priyanka Chopra : गूड न्यूज! अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बनली आई, सरोगसीद्वारे दिला बाळाला जन्म
- Srivalli : तुझी झलक अशरफी! श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनची धूम; पोलीस कॉन्स्टेबलने तयार केलेलं गाणं तुफान व्हायरल
- Coronavirus : कोरोनातून बरे झाल्यावर बदला 'या' गोष्टी, पुन्हा संसर्ग होण्यापासून होईल बचाव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha