विकी कौशल-कतरिना एकमेकांना डेट करतायेत? एका अभिनेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वी कतरिना कैफ कॉफी विथ करण शोमध्ये सहभागी झाली होती, त्यावेळी तिला विचारण्यात आलं होतं की कोणत्या अभिनेत्यासोबत तुझं नाव जोडलेलं तुला आवडेल? त्यावर तिने विकी कौशलचं नाव घेतलं होतं.
मुंबई : बॉलिवूड सिनेमांव्यतिरिक्त प्रेम प्रकरणांमुळे नेहमीच चर्चेत असतं. आता आणखी एक जोडीची जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांची जवळीत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. मात्र ते म्हणतात प्रेम लपवता येत नाही, तसंच काही या दोघांबद्दल झालं आहे. अभिनेता हर्षवर्धन कपूरने एका मुलाखतीत कतरिना कैफ आणि विकी कौशलबद्दल असं काही सांगितलं की दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं पक्क झालं आहे.
हर्षवर्धन 'कॉफी विथ करण' या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याला विचारलं की बॉलिवूडमधील अशी कोणती अफवा आहे की जी खरी आहे किंवा पीआरद्वारे उठवली गेली आहे. यावर हर्षवर्धन कपूरने म्हटलं की, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या प्रेमप्रकरणाची जी चर्चा सुरु आहे ती खरी आहे. त्यानंतर हर्षवर्धनने म्हटलं की हे सांगितल्याने माझ्या अडचणीत वाढ होणार आहे.
मात्र हर्षवर्धनच्या माहितीमुळे कतरिना आणि विकी कौशल यांच्याबाबत सुरु असलेली चर्चा खरी ठरली आहे. याआधी कतरिना कैफ कॉफी विथ करण शोमध्ये सहभागी झाली होती, त्यावेळी तिला विचारण्यात आलं होतं की कोणत्या अभिनेत्यासोबत तुझं नाव जोडलेलं तुला आवडेल? त्यावर तिने विकी कौशलचं नाव घेतलं होतं.
यानंतर विकी कौशल जेव्हा कॉफी विथ करण या शोमध्ये सहभागी झाला होता, त्यावेळी कतरिनाने दिलेलं उत्तर ऐकून विकी कौशलला आनंद झाला होता. मात्र त्यानंतर विकी आणि कतरिना अनेकदा एकत्र दिसले होते. दोघे एकत्र वेकेशनवर गेल्याचीही चर्चा आहे. मात्र दोघांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे दोघे आपल्या नात्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना देणार की ही देखील अफवा ठरणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
इतर बातम्या
Vicky Kaushal | अभिनेता विकी कौशलला कोरोनाची लागण, सोशल मीडियातून दिली माहिती