एक्स्प्लोर

बॉलिवूड फक्त 'सीक्वेल भरोसे', 2025 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवणार? येत्या वर्षात प्रेक्षकांवर फ्रेंचायझीचा भडीमार

Bollywood Upcoming Movies in 2025 : येत्या 2025 वर्षात बॉलिवूडमध्ये सीक्वेल आणि फ्रेंचायझी चित्रपटांचा धमाका पाहायला मिळणार आहे. येत्या वर्षात प्रेक्षकांवर फ्रेंचायझीचा भडीमार होणार आहे.

Bollywood Trend in 2025 : बॉलिवूडमध्ये अलिकडच्या काळात सीक्वेल आणि फ्रेंचायझीचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. बॉलिवूड चित्रपट फक्त फ्रेंचायझीवर आधारित आहे. बॉलिवूड निर्माते नवीन चित्रपट आणि कथेवर विश्वास ठेवण्यापेक्षा फ्रेंचायझीमध्ये पैसे लावणं जास्त पसंत करतात. वेगळा चित्रपट आणि कथेवर पैसे लावण्याचा जुगार खेळण्यापेक्षा निर्माते सीक्वेल आणि फ्रेंचायझीवरील चित्रपटांना प्राधान्य देतात. हेच कारण आहे की, बॉलिवूडमध्ये सीक्वेलचा भडिमार पाहायला मिळत आहे. दिवाळी  'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' चित्रपट यांची बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर झाली. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले, तरही दोघांनी जबरदस्त कमाई केली. आता 2025 मध्ये देखील सीक्वेल आणि फ्रेंचायझीचा भडिमार पाहायला मिळणार आहे.

2025 मध्ये 'या' चित्रपटांचे सीक्वेल येणार

येत्या वर्षात म्हणजे 2025 मध्ये अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांची सीक्वेल आणि अनेक फ्रेंचायझीचे चित्रपट येत आहेत. या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या हिट चित्रपटांच्या सीक्वेची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. बॉलिवूड प्रेमींसाठी पुढचे वर्ष ब्लॉकबस्टर सीक्वेल आणि फ्रेचायझींनी भरलेले असणार आहे. 2025 मध्ये बागी 4, रेड 2, जॉली एलएलबी 3, हाऊसफुल 5, वॉर 2 आणि वेलकम टू द जंगल यांसारख्या बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

'या' चित्रपटांची वाट पाहत आहेत प्रेक्षक

दिर्ग्दशक रोहित शेट्टीने गोलमाल 5 ची घोषणा केली आहे. फक्त कॉमेडी आणि ॲक्शन चित्रपटच नाही तर कल्ट क्लासिक 'मासूम'चाही रिमेक होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी अलीकडेच त्यांच्या 1983 च्या हिट 'मासूम' चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे ज्यात शबाना आझमी आणि नसीरुद्दीन त्यांच्या भूमिका पुन्हा साकारणार आहेत. सुभाष घई यांनी 'ऐतराज' चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केली आहे. याशिवाय अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल यांच्यासोबत भागम भाग या 2006 साली आलेल्या हिट कॉमेडी चित्रपटाचाही सीक्वेल बनवण्याची योजना असल्याच्या अफवा आहेत, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

निर्मात्यांना सीक्वेलचा अधिक फायदा

कोरोनानंतरच्या काळात बॉलिवूड चित्रपटांचा व्यवसाय कमी झाला होता. कोरोनाकाळात झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी निर्मात्यांनी सीक्वेल आणि अनेक फ्रेंचायझीवर जास्त विश्वास दाखवला. जेव्हा चित्रपटाचा व्यवसाय कमी होताना दिसतो, तेव्हा निर्माते सीक्वेल आणि फ्रेंचायझीचा प्लॅन वापरतात. चित्रपट निर्माते जास्त करुन सीक्वेल आणि फ्रँचायझींवर अवलंबून आहे. याचं आणखी एक कारण म्हणजे मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना सीक्वेल आणि फ्रेंचायझीचे चित्रपट पाहण्यात रस आहे. प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर ओळखीची पात्रे पुन्हा नव्या शैलीत दाखवणं निर्मात्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचं चित्र आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rakkayie Teaser : 'लेडी सुपरस्टार' नयनताराच्या आगामी चित्रपटाची झलक! पुष्पा अन् केजीएफला टक्कर देणारा 'रक्कायी' चित्रपटाचा ॲक्शन पॅक टीझर समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंनी मांडलेल्या हक्कभंगावर रोहित पवारांचं निवेदनABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 8PM 25 March 2025Job Majha : NMDC स्टील लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 25 March 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 7PM 25 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
Embed widget