एक्स्प्लोर

'टायगर' पाठोपाठ 'मैदान'लाही तोक्ते चक्रीवादळाचा फटका, चित्रपटाचा सेट उद्ध्वस्त

मुंबईबाहेर असलेल्या अजय देवगण यांच्या 'मैदान' चित्रपटाच्या सेटला या वादळाचा फटका बसलाय.  हा सेट उद्धवस्त झाल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने मुंबई हालवून सोडली. मोठ्या लाटा तर आल्याच शिवाय, अनेक झाडंही पडली. या चक्रीवादळाचा फटका केवळ मुंबईत नाही तर मुंबईबाहेरही बसला आहे. सिनेमांच्या सेट्सना याचा फटका बसला आहे. मुंबईबाहेर असलेल्या अजय देवगण यांच्या 'मैदान' चित्रपटाच्या सेटला या वादळाचा फटका बसलाय. याचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. 

अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेला 'मैदान' हा चित्रपट गेल्या लॉकडाऊनपासून रखडला आहे. बोनी कपूर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला लॉकडाऊन लागल्यानंतर ग्रहण लागलं आहे. खरंतर हा चित्रपट एका फुटबॉलपटूच्या जीवनावर बेतला आहे. सईद अब्दूल रहीम यांच्या जीवनावर हा सिनेमा बेतला आहे. चित्रपटाचं काही चित्रिकरण मुंबईजवळच्या स्टेडिअममध्ये झालं आहे. काही कोलकत्याला आहे. तर बरंच चित्रिकरण मुंबई बाहेरच्या विस्तीर्ण मैदानावर होतं आहे. यासाठी तब्बल 16 एकरची जमीन घेण्यात आली आहे. यावर सेट बांधण्यात आला होता. तौक्ते वादळाने या जागेचं बरंच नुकसान केलं. 

हे चक्रीवादळ आलं ते्व्हा सेटची काळजी घेण्यासाठी 40 पेक्षा जास्त माणसं तिथे होती. यात काही सुरक्षारक्षकांचाही समावेश होतो. त्यांनी हे वादळ आल्यानंतर सेट वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. हा सेट उद्धवस्त झाल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे. गेल्या लॉकडाऊन पासून या सिनेमाला ग्रहण लागलं आहे. फुटबॉलवर हा चित्रपट बेतला असल्याने मैदान हे त्याचं मुख्य अंग आहे. आधी लॉकडाऊन आणि आता पुढे येणारा पाऊस या सगळ्या गोष्टींमुळे निर्मात्यासमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे.  

या वादळाचा फटका मुंबईतल्या काही सेट्सनाही बसला. ज्या सेटवर पत्रे होते ते पत्रे तर उडून गेलेच. पण काही ठिकाणी पडझडही झाली. 'टायगर 3' च्या सेटलाही याची झळ बसली. हा सेट फिल्मसिटीत आहेत. फिल्मसिटीत असलेल्या बाळूमामावर बेतलेल्या मालिकेच्या सेटवरचे पत्रेही उडून गेले. या सेटवर काही शेळ्या, घोडे, म्हशी आहेत. पण त्यांचा गोठा मजबूत असल्यामुळे त्यांना अपाय झाला नाही. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीतAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
×
Embed widget