Maratha Reservation : 27 तारखेपर्यंत मराठा समाजाने शांत राहावं, आपली भूमिका त्या दिवशीच ठरेल: खासदार संभाजीराजे छत्रपती
Maratha Reservation : सध्याची परिस्थिती पाहता लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे असं सांगत येत्या 27 तारखेला आपण समाजाची भूमिका जाहीर करु असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकार राज्यावर तर राज्य सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे अशी टीका खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. मी सामंज्यस्याची भूमिका घेतो, काही लोक टीमटीम करत आहेत असाही आरोप त्यांनी केला. येत्या 27 तारखेला आपण मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची भेट घेणार असून त्यांच्यासमोर समाजाची भूमिका मांडणार असल्याचं सांगत, आपली भूमिकाही त्या दिवशीच ठरेल असं खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं.
आंदोलन कसे करायचे आम्हला सांगण्याची गरज नाही असं सांगत मी शांत आहे, संयमी आहे, शिवाजी महाराज व शाहू महाराज यांचे आपल्यावर संस्कार आहेत असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते म्हणाले की, "शिवाजी महाराजांनीही वेळप्रसंगी अनेक वेळा तह केले. सध्याची परिस्थिती पाहता लोकांचा जीव वाचण्याची गरज आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मी तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे."
आरक्षणाच्या मुद्द्यावर 27 तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना भेटणार
येत्या 27 तारखेला आपण मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची मराठा आरक्षण प्रश्नी भेट घेणार असल्याचं सांगत आपली भूमिका काय आहे हे त्याच दिवशी ठरणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. राज्यातील आमदार, खासदारांना माझं सांगणं आहे की ज्यावेळी माझी भूमिका मांडली जाईल त्यावेळी माझं-तुझं केलं तर याद राखा असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. तोपर्यंत मराठा समाजाने शांत रहावं असं आवाहन संभाजीरांजे छत्रपतींनी केलं.
सारथी संस्थेला राजर्षी शाहू महाराजांचे नाव दिले असले तरी त्यामध्ये काहीच काम केलं जात नसल्याचा आरोप खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केलाय. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असंही त्यांनी सांगितलं आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नी पंतप्रधानांकडे चार वेळा वेळ मागितली, ती मिळाली नाही. तरीही अजून त्यांच्याशी संपर्क सुरु असल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं. ते म्हणाले की, राज्य सरकारने मराठा समाजाच्या तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Update : कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, गेल्या 24 तासात 2.76 लाख नव्या रुग्णांची भर तर 3,874 जणांचा मृत्यू
- Petrol Diesel Price Hike : इंधन दरवाढीने सामान्यांचं मोडलं कंबरडं, गेल्या पाच वर्षात पेट्रोल 39 तर डिझेल 40 रुपयांनी महागलं
- 8 महिन्यांच्या गरोदर असताना घरबसल्या कोरोना चाचणीचं किट बनवलं, Mylab च्या मीनल दाखवे भोसले यांना सलाम