Bollywood Actress : चिमुकल्या मुलीसोबत काम करण्यासाठी टॉप डायरेक्टर्ससह अभिनेत्यांचीही इच्छा, नवरा सुपरस्टार; कोण आहे ही अभिनेत्री ओळखलं का?
Bollywood Actress : फोटो पाहून या फोटोतील लहान मुलगी नक्की कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या चिमुकल्या मुलीसोबत काम करण्यासाठी टॉप दिग्दर्शकांसह अभिनेत्यांचीही इच्छा असते. या अभिनेत्रीचा पती सुपरस्टार आहे.
![Bollywood Actress : चिमुकल्या मुलीसोबत काम करण्यासाठी टॉप डायरेक्टर्ससह अभिनेत्यांचीही इच्छा, नवरा सुपरस्टार; कोण आहे ही अभिनेत्री ओळखलं का? Bollywood Actress Top Directors Actors in Queue to Work With This Actress husband Also Bollywood Superstar Who is She know Details Entertainment Latest Update Marathi News Bollywood Actress : चिमुकल्या मुलीसोबत काम करण्यासाठी टॉप डायरेक्टर्ससह अभिनेत्यांचीही इच्छा, नवरा सुपरस्टार; कोण आहे ही अभिनेत्री ओळखलं का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/bb263acdc8d615057f53e5135fd947201714926176828254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bollywood Actress : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. कलाकरांचे लहानपणीचे फोटो पाहून त्यांना ओळखणं कठीण होतं. आता एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक लहान मुलगी हसताना दिसत आहे. फोटोतील चिमुकली नक्की कोण आहे हे ओळखणं कठीण आहे. फोटोतील ही लहान मुलगी आता आई होण्यासाठी सज्ज आहे. आता या हिंटनंतर फोटोतील चिमुकली कोण याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. फोटोतील चिमुकली दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आहे. दीपिकाचा हा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दीपिकाच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
दीपिका पादुकोणच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे,"रणवीर सिंहची पत्नी". दुसऱ्याने लिहिलं आहे,"दीपिका आणि हार्ट इमोजी टाकले आहेत". दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. दीपिका आणि रणवीर सप्टेंबरमध्ये आई-बाबा होणार आहेत. प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर दीपिका पादुकोण पहिल्यांदा राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगमध्ये दिसून आली होती. त्यावेळी पापराझींनी तिचं ग्रँड स्वागत केलं होतं.
View this post on Instagram
दीपिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घ्या... (Deepika Padukone Upcoming Movies)
दीपिका पादुकोण शेवटची बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या चित्रपटात झळकली होती. दीपिकाचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. दीपिका लवकरच प्रभास (Prabhas) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'कल्कि 2989 एडी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील दीपिकाचा लूक आता समोर आला आहे.
दीपिका पादुकोणने शाहरुख खानच्या 'ओम शांति ओम' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे. दीपिका आज बॉलिवूडची 'मस्तानी' आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली आहे. 16 वर्षांच्या सिनेप्रवासात तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दीपिका आज कोट्यवधींची मालकीन आहे.
दीपिकाची संपत्ती किती? (Deepika Padukone Networh)
दीपिका पादुकोण फक्त चित्रपट नव्हे तर जाहिरातींच्या माध्यमातून चांगलीच कमाई करते. अनेक चित्रपटांची ती निर्मितीदेखील करते. तसेच अनेक कंपन्यांमध्ये तिने गुंतवणूक केली आहे. दीपिकाच्या निर्मिती संस्थेचं नाव का प्रोडक्शन असं आहे. या निर्मिती संस्थेअंतर्गत तिने 83 आणि छपाक सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. दीपिका पादुकोणची एकूण संपत्ती 500 कोटी रुपयांच्या आसपास आहे. एका चित्रपटाचे ती 30 कोटी रुपये चार्ज करते. अशाप्रकारे वर्षाला ती 40 कोटी रुपयांची कमाई करते.
संबंधित बातम्या
Anil Kapoor : 'या' अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी 65 वर्षीय अनिल कपूर पत्नीला सोडण्यास झाला तयार, कोण आहे 'ही' अभिनेत्री?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)