(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ranveer Singh NBA: रणवीर सिंह बनला एनबीएचा ब्रँड अॅम्बेसेडर
रणवीरने यापूर्वी टोरोंटो येथे एनबीए ऑल-स्टार 2016 मध्ये भाग घेतला होता, जिथे तो एनबीए ऑल-स्टार गेममध्ये कोर्टासमोर बसला होता.
Ranveer Singh NBA Brand Ambassador: अभिनेता रणवीर सिंह याची गुरुवारी नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) भारतासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली. लहानपणापासूनच बास्केटबॉल आणि एनबीएची आवड होती. संगीत, फॅशन आणि मनोरंजनासह लोकप्रिय संस्कृतीवरील त्याच्या प्रभावामुळे मी नेहमीच त्याकडे आकर्षित होतो, असं रणवीरने सांगितलं. 2021-22 मध्ये ऐतिहासिक 75 व्या वर्धापन दिन काळात भारतात लीगचे प्रोफाइल वाढवण्यासाठी रणवीर एनबीए सोबत काम करेल.
'गली बॉय' स्टार रणवीर क्लीव्हलँडमध्ये एनबीए ऑल-स्टार 2022 मध्ये सहभागी होईल. जिथे तो पडद्यामागील सोशल मीडिया कंटेन्ट पोस्ट करेल आणि एनबीए खेळाडू आणि दिग्गजांना भेटेल. रणवीरने यापूर्वी टोरोंटो येथे एनबीए ऑल-स्टार 2016 मध्ये भाग घेतला होता, जिथे तो एनबीए ऑल-स्टार गेममध्ये कोर्टासमोर बसला होता.
View this post on Instagram
एनबीएचे उपायुक्त आणि मुख्य परिचालन अधिकारी मार्क टॅटम म्हणाले की, बॉलिवूडचा एक आयकॉन आणि त्याच्या पिढीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक, रणवीर एनबीएचा फॅन आहे. आम्ही त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. रणवीर भारतात आणि जगभरातील विविध प्लॅटफॉर्मवरील चाहत्यांशी संवाद साधेल.
एनबीए एशियाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्कॉट लेव्ही म्हणाले, आमच्या नवीन इन्स्टाग्राम हँडल, एनबीए स्टाईलच्या लॉन्चिंगचे शीर्षक देण्यासाठी रणवीर हा परिपूर्ण आहे, जो बास्केटबॉल आणि संस्कृतीमधील सुसंवाद शोधतो.