एक्स्प्लोर
अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर
'आपण अपेक्षा करतो, ते देणं आयुष्यासाठी बंधनकारक नाही' या आशयाचा मार्गारेट मिशेल यांचा कोट इरफानने पोस्ट केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर झाल्याचं निदान झालं आहे. खुद्द इरफाननेच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. मार्गारेट मिशेल यांचा कोट पोस्ट करुन इरफानने आपल्या आयुष्याचं अस्ताव्यस्त झालेलं चित्र चाहत्यांसमोर मांडलं.
'आपण अपेक्षा करतो, ते देणं आयुष्यासाठी बंधनकारक नाही' या आशयाचा मार्गारेट मिशेल यांचा कोट इरफानने पोस्ट केला आहे. त्यानंतर 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर'चं निदान झाल्याची माहिती इरफानने दिली. इरफानने ही पोस्ट ट्विटरला पिन केली आहे.
'अनपेक्षित गोष्टींमुळे आपली वाढ होते. गेल्या काही दिवसात तेच घडत गेलं. मला 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' झाल्याचं समजलं. सध्या तरी कठीण झालं आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचं प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला उपचारांसाठी परदेशात जावं लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो. न्यूरो म्हणजे प्रत्येक वेळी मेंदूशी संबंधित नाही, हेच उत्तर मी अफवांना देईन. गूगल करणं हा संशोधनाचा सोप्पा मार्ग आहे. ज्यांनी माझ्या शब्दाखातर वाट पाहिली, त्यांना आणखी किस्से सांगण्यासाठी मी परत येईन, हीच आशा' असं इरफानने लिहिलं आहे.
???????? pic.twitter.com/IDThvTr6yF
— Irrfan (@irrfank) March 16, 2018
इरफानच्या आजारपणावर पत्नीची फेसबुक पोस्ट
इरफान आजारी असल्यामुळे सिनेमाचं शूटिंग पुढे ढकलत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी दिली होती. त्याचवेळी इरफानच्या प्रकृतीबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर इरफानने स्वतःच आपल्याला दुर्धर आजार झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. मात्र तरीही चर्चा काही थांबल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या पत्नीने चाहते आणि मित्र परिवाराला शांततेचं आव्हान केलं. 'मी कधीही माझे निर्णय आणि आव्हानांसमोर हार पत्करली नाही. त्यामुळे या परिस्थितीलाही तोंड देईन.' असा आशावाद इरफानने व्यक्त केला होता. 'कुणीही प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये, अशी सर्वांना विनंती आहे. डॉक्टर या आजाराच्या निदानापर्यंत पोहचतील, तेव्हा पुढच्या 10 दिवसात मी स्वतःच याबाबत माहिती देईन' असं इरफान म्हणाला होता. इरफान खानची भूमिका असलेला ब्लॅकमेल हा सिनेमा 6 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. त्याशिवाय, विशाल भारद्वाज दिग्दर्शित दीपिका आणि इरफानची भूमिका असलेल्या चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. एस हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे.संबंधित बातम्या :
दुर्धर आजाराने इरफान खानला ग्रासलं, सोशल मीडियावर पोस्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement