एक्स्प्लोर
Advertisement
BMW चं चाक निघालं, बिग बींचा मोठा अपघात टळला
एअरपोर्टला जाताना एजेसी बोस उड्डाणपुलाजवळ रेड रोडवर अचानक त्यांची कार डुगडुगायला लागली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या गाडीचं चाकही निघालं.
कोलकाता : सुपरस्टार अमिताभ बच्चन एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. बिग बींना कोलकाता विमानतळावर नेण्यासाठी भाड्याने घेतलेल्या बीएमडब्ल्यू कारचं चाक निघाल्याची माहिती आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने संबंधित फाईव्ह स्टार हॉटेलकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.
शुक्रवारी कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटनासाठी बच्चन आले होते. शनिवारी त्यांना BMW 7 सीरिजमधील एका कारने विमानतळावर नेलं जात होतं. ही सर्व व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली होती.
एअरपोर्टला जाताना एजेसी बोस उड्डाणपुलाजवळ रेड रोडवर अचानक त्यांची कार डुगडुगायला लागली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या गाडीचं चाकही निघालं. त्यामुळे त्यांनी गाडीतून खाली उतरुन रस्त्यावर उभं राहावं लागलं.
पश्चिम बंगालचे पंचायत मंत्री सुब्रता मुखर्जी यांची कारही त्याच ताफ्यात होती. बच्चन यांना रस्त्यावर उभं पाहून मुखर्जींनी गाडी थांबवली आणि बिग बींना आत बसवलं.
'कार झोंकाडे घ्यायला लागली, तेव्हा टायर पंक्चर झाला, असं आम्हाला वाटलं. मात्र गाडीत बिघाड झाला होता. सुदैवाने मोठा अपघात टळला. आम्ही वेळेवर विमानतळावर पोहचलो.' असं सुब्रता मुखर्जींनी सांगितलं.
आरामदायी प्रवासासाठी कारमध्ये स्प्रिंगऐवजी एअर सस्पेंशन लावण्यात आले होते. मात्र डाव्या बाजुच्या एअर सस्पेंशनमध्ये लीकेज असल्यामुळे गाडी एका बाजूला झुकली. सामान्यतः जेव्हा कार धावते, तेव्हा एअर लेव्हल आपोआप बॅलन्स होते. मात्र बिग बींची कार एकीकडे झुकल्याचं लक्षात येताच खबरदारी म्हणून ती कार थांबवण्यात आली. गाडी वेगात असती, तर अपघात घडू शकला असता, असं सूत्रांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement