एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काळवीट शिकार | खोट्या प्रतिज्ञापत्रा प्रकरणी सलमान निर्दोष
'हम साथ साथ है' चित्रपटाच्या वेळी जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी 1998 साली सलमानविरोधात चार केसेस दाखल करण्यात आल्या होत्या.
जोधपूर : 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या आरोपातून अभिनेता सलमान खानची जोधपूरमधील सेशन्स कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. शस्त्रास्त्र बाळगण्याचा परवाना नूतनीकरणासाठी दिला असताना सलमानने ते हरवल्याची खोटी माहिती सलमानने प्रतिज्ञापत्रात दिली होती.
खोटं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा सलमानचा इरादा नव्हता, असा युक्तिवाद सलमानच्या वतीने वकिलांनी कोर्टात केला. मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे सलमानने आपला परवाना सादर केला होता. पोलिस उपायुक्तांनी यासंदर्भात कोर्टात जबानी दिली होती, याकडे सलमानच्या वकिलांनी लक्ष वेधलं.
'हम साथ साथ है' चित्रपटाच्या वेळी जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी 1998 साली सलमानविरोधात चार केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन काळवीट हत्या प्रकरणात, तर एक शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आली होती.
सलमान खान अवैध शस्त्र खटल्यातूनही सुटला!
खटला कुणी दाखल केला?
सलमान खानसह सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्याविरोधात बिष्णोई समाजातील लोकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यावेळी सलमानवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अटक करताना पोलिसांनी सलमानच्या रुममध्ये दोन रायफल मिळाल्या, ज्यांचा परवाना संपलेला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
काळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 एप्रिल 2018 रोजी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याला पाच वर्षांचा कारावास सुनावण्यात आला होता. सलमानने जोधपूर कारागृहात दोन रात्री घालवल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. सलमानचे सहकलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
काळवीट शिकारप्रकरणाचा आज निकाल, आरोपी सिनेस्टार जोधपूरमध्ये
काळवीट शिकार : सलमानसह इतर कलाकार जोधपुरात दाखल
जोधपूर विमानतळावर अभिनेत्री तब्बूसोबत गैरवर्तन
काळवीट शिकार प्रकरणी सलमानचा फैसला 5 एप्रिलला
काळवीट शिकारप्रकरण, सैफ, तब्बू, सोनाली यांची जोधपूर न्यायालयात हजेरी
सात वर्षांची शिक्षा झाल्यास सलमान जोधपूर कोर्टातून थेट तुरुंगात
आर्म्स अॅक्ट प्रकरण : कोर्टात जात विचारल्यावर सलमान म्हणाला...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement