एक्स्प्लोर
Advertisement
सलमान अखेर ‘गॅलॅक्सी’त, चाहत्यांचा घराबाहेर जल्लोष
सलमान घरी पोहोचल्यानंतर त्याने गॅलरीत येऊन चाहत्यांना झलक दिली आणि घरी जाण्याचे आवाहनही केले. यावेळी गॅलरीत सलमानसोबत वडील सलीम खान, आई, बहीण अर्पिता इत्यादी मंडळी होती.
मुंबई : काळवीट प्रकरणातील गुन्हेगार सलमान खान अखेर मुंबईतील त्याच्या निवासस्थानी दाखल झाला. जोधपूर कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर सलमान मुंबईच्या दिशेने रवाना झाला आणि रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाला. तेथून गाड्यांच्या ताफ्यात सलमान वांद्र्यातील त्याच्या निवासस्थानी दाखल झाला.
सलमानच्या वांद्र्यातील घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सलमान घरी पोहोचल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. चाहत्यांनी घोषणा देत, जल्लोष केला.
सलमान घरी पोहोचल्यानंतर त्याने गॅलरीत येऊन चाहत्यांना झलक दिली आणि घरी जाण्याचे आवाहनही केले. यावेळी गॅलरीत सलमानसोबत वडील सलीम खान, आई, बहीण अर्पिता इत्यादी मंडळी होती.
नेमकं प्रकरण काय आहे?
काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.
यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.
लाईव्ह अपडेट :
LIVE UPDATE : सलमान खानची चाहत्यांना झलक...
LIVE UPDATE : गुन्हेगार सलमान खानचं चाहत्यांकडून फटाक्यांच्या आतषबाजी करुन स्वागत
LIVE UPDATE : सलमान खान वांद्र्यातील निवासस्थानी दाखल
LIVE UPDATE : सलमान मुंबई विमानतळावरुन वांद्र्याच्या दिशेने रवाना, घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी, पोलिसांकडूनही कडेकोट बंदोबस्त
LIVE UPDATE : सलमान खानच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी, पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था
LIVE UPDATE : सलमान खानच्या गाड्यांचा ताफा मुंबई विमानतळावरुन वांद्र्यातील त्याच्या घराच्या दिशेने रवाना
LIVE UPDATE : सलमान खान जोधपूरहून मुंबईत दाखल, मुंबई विमानतळावर सलमान पोहोचला
जयपूर : काळवीट शिकार प्रकरणात दोन रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अभिनेता सलमान खानची अखेर जामीनावर सुटका झाली आहे. जामीनाच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून तो बाहेर आला. सलमान खान चार्टर्ड प्लेनने मुंबईला रवाना झाला आहे.
तत्पूर्वी सलमान खानला आज दुपारी जामीन मंजूर झाला. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
सलमान खानच्या सुटकेपूर्वी जोधपूर पोलिसांनी विशेष व्यवस्था केली होती. जोधपूर सेंट्रल जेल ते विमानतळ या अडीच किलोमीटरच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
- सलमानला जामीन ते सुटकेचा घटनाक्रमसकाळी 9.57 वाजता : जामीन अर्जावरील सुनावणीसाठी न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी न्यायालयात दाखलसकाळी 10.15 वाजत : सलमानची बहिण अलविरा, बॉडीगार्ड शेराही कोर्टात दाखलसकाळी 10.20 वाजता : सलमानच्या सुरक्षारक्षकांची पत्रकार, कॅमेरामनना धक्काबुक्की, वातावरणात काही काळ तणावसकाळी 10.34 वाजता : सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरुसकाळी 10.41 वाजता : सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरु, जामीनाला विरोधसकाळी 11.06 वाजता : जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण, निकालासाठी दुपारी दोनची वेळ निश्चितसकाळी 11.32 वाजता : सलमानला कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट नाही, जोधपूरच्या जेल अधिकाऱ्यांचा दावादुपारी 2.59 वाजता : सलमानला जामीन मंजूर, 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीनदुपारी 3.35 वाजता : जामीनाची बातमी मिळताच मुंबईत चाहत्यांचा जल्लोषदुपारी 4.40 वाजता : सलमानच्या सुटकेची कागदपत्रे तयारसंध्याकाळी 5.10 वाजता : सलमानला मुंबईला नेण्यासाठी चार्टर्ड प्लेन जोधपूरमध्ये दाखलसंध्याकाळी 5.35 वाजता : जामीनाची प्रक्रिया पूर्ण करत सलमान जेलबाहेर
LIVE UPDATE
- अखेर सलमान खानची जेलमधून सुटका
- चार्टर्ड प्लेनने सलमान खान जोधपूरहून मुंबईला रवाना होणार, 7.30 वाजेपर्यंत सलमान मुंबईत दाखल होण्याची शक्यता
- जामीनाची कागदपत्र जोधपूर मध्यवर्ती कारागृहात पोहोचली, थोड्याच वेळात सलमान खानची सुटका होणार
LIVE UPDATE
- सलमानच्या जामीन अर्जावर दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर निर्णय
- बिष्णोई समाजाच्या वकिलांचा सलमानच्या जामीनाला विरोध
- सलमानला जामीन मिळू नये, सरकारी वकिलांची कोर्टात मागणी
- काळवीट शिकार प्रकरण - न्यायाधीश जोशी आणि न्यायाधीश जोशी यांच्यात चर्चा सुरु
- सलमानची बहिण अलविरा आणि बॉडीगार्ड शेरा कोर्टात पोहोचला
- न्यायाधीश जोशी कोर्टाकडे रवाना
काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड
सलमानसाठी एक न्याय, अन् इतर कैद्यांना वेगळा न्याय!
सलमान न जेवता रात्रभर जमिनीवर झोपला
निकालानंतर सलमान कोर्ट रुममध्ये मान खाली घालून बसला!
...तर सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!
काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड
सलमानच्या जेलवारीमुळे 'या' अभिनेत्रीला आनंद!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement