(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdu Rozik Summoned By ED : 'बर्गीर' मध्ये पैसा लावून फसला अब्दु रोजिक, आता ईडी करणार हिशोब! काय आहे प्रकरण
Abdu Rozik Summoned By ED : एका स्टार्टअपमुळे अब्दु रोजिक हा ईडीच्या रडावर आला आहे.
Abdu Rozik Summoned By ED : अब्दु रोजिक (Abdu Rozik) हा ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता आहे. 2022 मध्ये जेव्हा तो बिग बॉस 16 चा स्पर्धक म्हणून मुंबईत आला तेव्हा भारतात त्याच्या नावाची खूप चर्चा झाली. बिग बॉस 16 दरम्यान अब्दू रोजिक भारतात प्रसिद्ध झाला आणि तो त्याच्या लक्झरी जीवनशैलीसाठी देखील ओळखला जातो. अब्दु रोजिकने बिग बॉस दरम्यान सांगितले होते की, त्याला बर्गर खूप आवडतात पण तो बर्गरला 'बर्गीर' म्हणत असे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर त्याने मुंबईत एक रेस्टॉरंट उघडले आणि आता त्याला याच प्रकरणात ईडीकडून समन्स धाडण्यात आले आहे. काय आहे सगळे प्रकरण?
>> अब्दु रोजिक ईडीच्या रडारवर का आला?
अब्दु रोजिकची लाइफस्टाइल ही लक्झरी आहे. त्याने सुरू केलेल्या फूड स्टार्टअप कंपनीत दुसऱ्या कंपनीचे पैसे गुंतवले गेले. वृत्तांनुसार, अब्दुच्या कंपनीत ज्या कंपनीचा पैसा गुंतवला आहे ती ड्रग्सचा व्यवहार करते. या प्रकरणी ईडीने आता अब्दुला समन्स बजावले असून आता त्याची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात बिग बॉस 16 चे अब्दु रोजिकच नाही तर शिव ठाकरे देखील अडकला आहे.
View this post on Instagram
1. वृत्तांनुसार, हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक अली असगर शिराझी यांनी 2022-23 मध्ये स्टार्टअपसाठी अब्दु रोजिकला पैसा दिला होता. अब्दु याच्यासोबत अभिनेता शिव ठाकरेने देखील फंड घेतला होता.
2. 2023 साली अब्दुने मुंबईत बर्गीर रेस्टॉरंट उघडले. ईडीचे म्हणणे आहे की ज्या कंपनीने स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांनी अमली पदार्थाच्या व्यवसायातून कमाई केली आहे. वृत्तानुसार, शिराजीच्या या अमली पदार्थाच्या व्यवसायातून कामातून कमावलेला पैसा हा विविध स्टार्टअप्सना देण्यात आला.
3. या प्रकरणात, प्रथम शिव ठाकरे याला ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीमध्ये शिव ठाकरेने सांगितले की, ज्यावेळी त्याला या शिराजीच्या पैशांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याने आणि अब्दु रोजिकने करार रद्द केला. शिव आणि अब्दू या दोघांच्या म्हणण्यानुसार त्यांना शिराजी कंपनीची पार्श्वभूमी माहीत नव्हती, त्यांची ओळख एका कॉमन फ्रेंडने या कंपनीशी केली होती.
4. शिव ठाकरे याला चहा आणि स्नॅक्स विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करायचा होता आणि अब्दू याला 'बर्गीर' हा बर्गर ब्रँड सुरू करायचा होता. त्यांच्या ओळखीने त्यांची ओळख हसलर्स हॉस्पिटॅलिटीचे संचालक कृणाल ओझा यांच्याशी झाली. कृणालने दोघांनाही त्याच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर दिली होती.
5. शिव ठाकरेने ईडीला सांगितले की, काही कारणास्तव तो त्याचे रेस्टॉरंट उघडू शकले नाही. तर अब्दूने मे 2023 मध्ये बर्गीर रेस्टॉरंट उघडले. या लाँचिंगच्या वेळी अनेक बडे बॉलीवूड स्टार्स उपस्थित होते. आता शिव ठाकरे यांच्यानंतर ईजी अब्दू रोजिक यांची चौकशी करणार आहेत.
ताजिकिस्तानमध्ये जन्म झालेला अब्दु रोजिक हा 20 वर्षांचा आहे. परंतु काही आजारामुळे त्याची उंची वाढू शकली नाही.अब्दूची सलमान खान इतर बॉलिवूड सेलिब्रेटीसोबत चांगली ओळख आहे. बिग बॉसमुळे तो भारतात चांगलाच प्रसिद्ध झाला.