एक्स्प्लोर

Vicky Jain : उद्योगपती ते 'बिग बॉस 17'चा स्पर्धक; अंकिता लोखंडेचा पती विकी जैन कोण आहे? जाणून घ्या

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेचा पती (Anikita Lokhande) विकी जैन (Vicky Jain) 'बिग बॉस 17'मध्ये सहभागी झाला आहे.

Vicky Jain : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम असून आता या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर पार पडला आहे. 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेसह (Ankita Lokhande) तिच्या पतीची अर्थात विकी जैनची (Vicky Jain) 'बिग बॉस 17'मध्ये एन्ट्री झाली आहे. 

अंकिता लोखंडे आणि विकी जैन 2021 मध्ये लग्नबंधनात अडकली. त्यानंतर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असे. आता अंकिता आणि विकीची जोडी 'बिग बॉस'मध्ये धमाका करायला सज्ज आहे. 'बिग बॉस 17'मध्ये विकी जैनची एन्ट्री झाल्यापासून तो नक्की कोण आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

उद्योगपती ते 'बिग बॉस 17'चा स्पर्धक

विकी जैन हा छत्तीसगड येथील रायपुरात राहणारा आहे. तो एक उद्योगपती आहे. पण कामामुळे तो मुंबईत असतो. मीडिया रिपोर्टनुसार, विकी जैनचं खरं नाव विकास कुमार जैन आहे. विकीच्या वडिलांचं नाव विनोद कुमार जैन असून आईचं नाव रंजना जैन आहे. विकीचं शालेय शिक्षणंही मुंबईत झालं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकी जैनने व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. 'महावीर कोल वॉशरीज प्राइवेट लिमिटेड' या कंपनीचा तो एमडी होता. तसेच महावीर इंस्पायर ग्रुपचा तो को-ओनरदेखील होता. 

अंकिता लोखंडेच्या पतीनेही मुंबईतही 8BHK अपार्टमेंट घेतला आहे. जिथे हे जोडपे लवकरच शिफ्ट होणार आहेत. विकीकडे 'लँड क्रूझर' (Land Cruiser) आणि 'मर्सिडीज-बेंझ' (Mercedes-Benz) कारचे कलेक्शन आहे. कार कलेक्शनच्या बाबतीत अंकिताही मागे नाहीय तिच्याकडे 'जॅग्वार एक्सएफ' (Jaguar XF) आणि 'पोर्श 718' (Porsche 718) आहेत.

विकी स्वतः देखील एक व्यावसायिक आहे आणि याच अनुषंगाने तो मुंबईत ये-जा करत असतो. दरम्यान, मित्राच्या माध्यमातून त्याची अंकिता लोखंडेसोबत गाठ पडली. आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. तब्बल तीन वर्षांनी दोघांचे लग्न झाले. आता अंकिता लोखंडे आणि विकी जैनला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

संबंधित बातम्या

Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Embed widget