Abhijeet Khandkekar : 'पोलीस स्थानकात गेलो अन् तिथे मलाच शालजोडीतले दिले',अभिजीत खांडकेकरने सांगितला आयुष्यातला लज्जास्पद प्रसंग
Abhijeet Khandkekar : अभिनेता अभिजीत खांडकेकरने त्याच्या आयुष्यातला एक लज्जास्पद प्रसंग सांगितला आहे. पोलिस स्थानकात हा प्रसंग घडला होता. त्यावर अभिजीतने भाष्य केलं आहे.
Abhijeet Khandkekar : 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा घराघरात पोहचला. या मालिकेत तो मृणाल दुसानिस हिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर त्याच्या 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला देखील बरीच पसंती मिळाली. मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेला अभिजीत अनेक तरुणींचा क्रश आहे. हाच अभिनेता अनेक मु्द्द्यांवर अगदी उघडपणे भाष्यही करतो. तसेच अभिजीतला ट्रॅफिकचे नियम न पाळणाऱ्यांविषयी देखील भयंकर राग आहे. याचाच एक अनुभव अभिजीत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.
अभिजीतने नुकतीच कॉकटेल स्टुडिओला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने त्याला आलेला एक अनुभव सांगितला आहे. यावेळी अभिजीतला ट्रॅफिक रुल्स न पाळणाऱ्यांबाबत विशेष प्रेम आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिजीतने त्याच्या आयुष्यातला एक लज्जास्पद प्रसंग सांगितला.
अभिजीतने काय म्हटलं?
अभिजीतने म्हटलं की, 'एकदा असं झालं एका कॅबवाल्याने मला कट मारला. मी त्याला शिवीगाळ न करता त्याला फक्त काय करतोस त्यावर मला काय ये काय ये करत आईबहिणीवरुन शिव्या दिल्यात.मग मला राग आला. म्हणून मी गाडी बाजूला घेतली. मी डोक्यात ठेवलं होतं की, अजिबात भांडणं करायची नाहीत. मी उतरलो आणि त्याच्या गाडीचे फोटो काढले. त्यावर तो बराच उद्धटपणे वागला की काय आहे, माझा काढ फोटो वैगरे. तरीही मी त्याला काही बोललो नाही. त्याचवेळी पोलिसांची एक गाडी आली. मी त्यांना सांगितलं की हा असं असं भांडणं करतोय. त्यांनी त्याला बाजूला घेऊन त्याचं लायसन्स वैगरे मागितलं. तेव्हा असं लक्षात आलं की तो त्यांच्याशी देखील उद्धटपणे बोलतोय, लायसन्सपण दाखवत नाहीये. तोपर्यंत त्या हवलदाराने मला ओळखलं. त्याने मला सांगितलं की ही आमची बीट चौकी आहे, तुम्ही पोलीस स्थानकात जा आणि रितसर तक्रार करा.मला परत बळ आलं. मी गेलो पोलीस स्थानकात. तिथेही त्यांनी मला ओळखलं. त्यांनी मला विचारलं की काय झालं. हे सांगताना माझ्या असं लक्षात आलं की, हे काही फार नव्हतं झालं. नंतर वाटलं की ठीक आहे आता आलोच आहोत तर बघूया.'
'आणि मला लाज वाटली...'
पुढे अभिजीतने म्हटलं की, 'मग ते त्याला थोडं रागवायला लागले. थोडं थांबून त्यांनी त्याला विचारलं की तू इथे आधी आला होतास नाही. त्यावर त्याचं एक नाही अन् दोन नाही. त्यांनी पुन्हा विचारलं.कधी आला होतास, तरी तो गप्प होता. त्यानंतर तिथे जे घडलं मला मी जरा घाबरलो. त्यांनी त्याला रपकन् एक खानाखाली दिली. तेव्हा त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून मला आजही शाहारा येतो.त्याने सांगितलं की मागच्या महिन्यात तुम्ही मर्डर केसमध्ये ज्या सहा जणांना आणलं होतं त्यात मी एक होतो. हे ऐकल्यानंतर मला असं झालं की का आणलं आपण ह्याला इथे, खाल्ल्या असत्या दोन शिव्या.त्यानंतर ते मोठ्या साहेबांना भेटायला घेऊन गेले. त्यांनीही सुरुवातीला विचारपूस दिली आणि नंतर मला शालजोडीतले दिले. ते बोलत त्याला होते पण ऐकवत मला होते.काय रे काय भांडणं करता, एवढच जर असेल तर जंगलात जाऊन रहा. माणसात राहता म्हणजे असं होणारच, कधीतरी गाडीला कट लागणारच. बाकी आम्ही सगळं सोडून तुमची ही भांडणंच सोडवत बसायची का. त्यावेळी मला फार लाज वाटली.'