एक्स्प्लोर
मराठी भाषेला बिग बींचा मानाचा मुजरा!
मुंबई : बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी मराठी दिनानिमित्त ट्विटरवरुन मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी ही विश्वामधील एकमात्र भाषा लिपी आहे, जी व्यक्तिला 'अ' म्हणजे "अज्ञानी" पासून शेवटी 'ज्ञ' म्हणजेच "ज्ञानी" बनवून टाकते, अशा शुभेच्छा बिग बींनी दिल्या.
''इंग्रजी मध्ये 'A' फॉर Apple ने सुरु होते आणि शेवटी 'Z' फॉर Zebra वर येऊन संपते.
शेवटी इंग्रजी जनावर बनवून सोडते.
पण मराठी ही विश्वामधील एकमात्र भाषा आहे,
जी व्यक्तिला 'अ' म्हणजे "अज्ञानी" पासून शेवटी 'ज्ञ ' म्हणजेच "ज्ञानी" बनवून टाकते.
मुजरा त्या मराठी भाषेला,
आपणांस मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..''
अमिताभ बच्चन.
https://twitter.com/SrBachchan/status/836089619758333952 बिंग बींनी मराठीतून शुभेच्छा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीलाही त्यांनी शिवरायांना मराठीतून नमन केलं होतं. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन आज (27 फेब्रुवारी) साजरा केला जाणार आहे. मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने आज 'गेट वे ऑफ इंडिया' इथे मराठी भाषा गौरव दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच राज्यासह देशभरातील मराठी बांधवाकडून मराठी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement