एक्स्प्लोर
अभिनेत्री रवीना टंडनविरुद्ध गुन्हा
सोशल मीडियावर रवीना टंडनचा मंदिरामध्ये चित्रीत झालेला व्हिडीओ समोर आल्यानंतर, लिंगराज मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापकांनी तिच्याविरोधात जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
भुवनेश्वर : अभिनेत्री रवीना टंडनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमधील श्री लिंगराज मंदिर प्रशासनाच्या तक्रारीनंतर रवीनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. भगवान शंकराचं श्री लिंगराज मंदिर हे अकराव्या शतकात बांधलेलं आहे.
कॅमेरा निषिद्ध क्षेत्रात एका जाहिरातीचं चित्रीकरण केल्याचा आरोप रवीनावर आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरु केला आहे.
रवीना टंडन रविवारी दुपारी भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिरात जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी आली होती. इथे कॅमेरा निषिद्ध क्षेत्रात तिने चित्रीकरण केलं.
सोशल मीडियावर रवीना टंडनचा मंदिरामध्ये चित्रीत झालेला व्हिडीओ समोर आल्यानंतर, लिंगराज मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापकांनी तिच्याविरोधात जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
"रवीनाने नो कॅमेरा झोनमध्ये चित्रीकरण केलं. यासाठी तिने कोणतीही परवानगी घेतली नव्हती," असा आरोप मंदिर प्रशासनाने केला आहे. केवळ मंदिरातील कर्मचाऱ्यांना मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी आहे, असंही प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.
हे कृत्य सुरक्षा आणि नियमांचं उल्लंघन आहे. या घटनेने भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनेही प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
रवीना टंडनचं स्पष्टीकरण!
यानंतर रवीनाची बाजूही समोर आली आहे. "मंदिरात फोनला बंदी असल्याचं मला माहित नव्हतं. तिथे सगळीकडे फोन होते आणि लोक सेल्फीही काढत होते. मंदिरात एकाने माझ्या ब्युटी आणि फिटनेसचं रहस्य विचारल्यावर मी सांगितलं. तेव्हा त्याने व्हिडीओही बनवला. मी मंदिरात जात असताना पोलिसांनी माझी बॅगही तपासली नव्हती. मी सगळ्याच मंदिरांचा आदर आणि सन्मान करते. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता," असं रवीना म्हणाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement