एक्स्प्लोर
Advertisement
संजय दत्तचं पुनरागमन, बापलेकीच्या नात्यावरील 'भूमी'चा ट्रेलर
अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सूडकथा पडद्यावर पाहायला मिळेल, असं अडीच मिनिटांच्या ट्रेलरमधून दिसत आहे.
मुंबई : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तचं पुनरागमन असलेला 'भूमी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ओमांग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बाप-लेकीच्या आयुष्यात आलेल्या एका वादळाची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री अदिती राव हैदरी 'भूमी'च्या टायटल रोलमध्ये आहे, तर संजय दत्त अरुण ही भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक शेखर कपूरही या सिनेमात दिसणार आहेत. अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सूडकथा पडद्यावर पाहायला मिळेल, असं अडीच मिनिटांच्या ट्रेलरमधून दिसत आहे. बापलेकीच्या नात्याचा एक वेगळा पैलू सिनेमात उलगडेल.
संजय दत्तच्या ‘भूमी’च्या पोस्टरचं डिझाईन ‘द ग्रे’ची कॉपी ?
‘भूमी’ सिनेमाची निर्मिती भूषण कुमार आणि संदीप सिंह यांनी केली आहे. मेरी कोम, सरबजित यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. आमीर खानच्या 'पीके' चित्रपटात संजय दत्तने लहानशी व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी चाहत्यांना संजय दत्तला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. 22 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पाहा ट्रेलर :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion