Bharti Singh Son Laksh Birthday : भारती सिंहचा लाडोबा झाला एक वर्षाचा; कॉमेडी क्वीनने शेअर केले गोलाचे गोड फोटो
Bharti Singh : भारती सिंहच्या मुलाचा अर्थात गोलाचा आज पहिला वाढदिवस आहे.
Bharti Singh Son Laksh Birthday : कॉमेडी क्वीन भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिम्बाचियाचा (Harsh Limbachiyaa) लाडोबा अर्थात लक्ष्यचा (Laksh Limbachiyaa) आज पहिला वाढदिवस आहे. लाडक्या लेकाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त भारती सिंहने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. तिने गोलाचे गोड फोटो शेअर करत त्याला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लाडक्या लेकाला भारतीच्या खास शुभेच्छा (Bharti Singh Son Laksh Birthday)
गोलाचे फोटो शेअर करत भारतीने (Bharti Singh) लिहिलं आहे,"लक्ष्य अर्थात गोला तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मोठा झाल्यावर आमच्यासारखाच हो. कायम आनंदात राहा". भारतीच्या या पोस्टवर चाहतेदेखील कमेंट्स करत गोलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सध्या सोशल मीडियावर गोलाचे फोटो व्हायरल होत आहेत. भारतीने वेगवेगळ्या लुकमधले गोलाचे फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
गोलाने जेहला टाकलं मागे
भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचियाचा गोला खूपच गोड आहे. नेटकरी आता गोला आणि करीना कपूरच्या जेह अली खानची तुलना करत आहेत. पण क्यूटनेसच्या बाबतीत गोलाने जेहलादेखील मागे टाकलं आहे.
भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया 2017 साली लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. भारतीने 3 एप्रिल रोजी मुलाला जन्म दिला आहे. छोट्या पाहुण्याच्या आगमनाने भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया खूश झाले आहेत. भारतीने युट्यूब चॅनलवर खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती.
भारती-हर्षने 'गोला' नाव का ठेललं?
भारती सिंह आपल्या मुलाला प्रेमाने ‘गोला’ म्हणते. जेव्हापासून तिचा मुलगा या जन्मला आहे, तेव्हापासून ती त्याला लाडाने ‘गोला’ म्हणते. चाहत्यांना वारंवार नाव विचारल्यानंतर भारतीने तिच्या मुलाचे नाव सोशल मीडियावर शेअर केले होते. भारती आणि हर्ष यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव 'लक्ष्य' ठेवले आहे आणि त्यांनी हे नाव निवडले कारण की, त्यांचा मुलगा कधीही त्याच्या ध्येयापासून विचलित होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे.
संबंधित बातम्या