एक्स्प्लोर

Bday Special : जावेद अख्तरनाच जेव्हा पाचही नामांकनं मिळाली

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार, कथा आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. जावेद अख्तरांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यापैकी हा एक विक्रम

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार, कथा आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. त्यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीत अनेक पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले आहे. अनेक मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्यांना नामांकनं मिळाली आहेत. याच जावेद अख्तरांनी एक विक्रमदेखील प्रस्थापित केला आहे. एखाद्या सिने, नाट्य पुरस्कार सोहळ्यात एकाच व्यक्तीला, एकाच विभागात एकापेक्षा जास्तवेळा नामांकनं मिळाल्याचे आपण पाहिले आहे. परंतु एकाच विभागातली पाचही नामांकनं एकाच व्यक्तीला मिळाल्याचे कधी ऐकले/पाहिले नसेल. परंतु अशी गोष्ट एकदा घडली आहे. तेही प्रसिद्ध फिल्पफेअर पुरस्कार सोहळ्यात. 2005 सालच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट गीतकार या विभागात जावेद अख्तर यांना पाचही नामांकनं मिळाली होती. हा एक विक्रमच आहे. Filmfare Awards 2005 सर्वोत्कृष्ट गीतकार विभाग नामांकनं 1. जावेद अख्तर - मैं हूं ना (मैं हूं ना) 2. जावेद अख्तर - ये तारा वो तारा (स्वदेस) 3. जावेद अख्तर - ऐसा देस है मेरा (वीर झारा) 4. जावेद अख्तर - मैं यहा हूं (वीर झारा) 5. जावेद अख्तर - तेरे लिये हम है जिये (वीर झारा) पाचही नामांकनं जावेद अख्तर यांनाच मिळाली होती. केवळ फिल्मफेअरच नाही, कुठल्याही पुरस्कार सोहळ्यांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले होते. पुरस्कारांची घोषणा करण्यापूर्वी जावेद साहेबांना सन्मानाने स्टेजवर नेण्यात आले. तेरे लिये गाण्यासाठी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मदन मोहन यांनी रचलेल्या चालींवर जावेद साहेबांनी गाणी लिहिली होती. अर्थात आधी कपडे शिवून तयार होते, त्या मापाचे बाळ आणले गेले! अख्तर यांच्या लेखणीतून एक सो एक डायलॉग्ज आणि गाणी उतरली आहेत. ते 'घर से निकलते ही...' पण लिहितात आणि 'जश्न ए बहारा' पण! 'पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद ना इन्हे रोके' किंवा 'संदेसे आते है...' सुद्धा त्यांच्याच लेखणीतून अवतरलंय. त्याचवेळी 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'सारखं गीतदेखील अख्तरांनी लिहून ठेवलंय. अशा या हरहुन्नरी गीतकाराला पंचाहत्तरीतील पदार्पणानिमित्त वंदन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News : 9 PM : नऊ सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 03 Oct 2024 : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात दर्जा, मराठीला फायदा काय? ABP MajhaUsha Mangeshkar on Marathi Bhasha Abhijat Darja : शब्द सुचत नाहीय, एवढा आनंद झालायDevendra Fadnavis on Marathi Bhasha : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
Gunaratna Sadavarte सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट
सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट
ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
Embed widget