![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kedar Shinde: "यशात आणि अपयशात एकच लक्षात ठेव..."; लेकीच्या वाढदिवशी केदार शिंदेची खास पोस्ट!
सना शिंदेच्या (Sana Shinde) वाढदिवसानिमित्त केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
![Kedar Shinde: baipan bhari deva fame director kedar shinde shared post for daughter sana shinde Kedar Shinde:](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/f786feeee6be7ad9eaa944559dacf9bf1697613792552259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kedar Shinde: दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) हे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तसेच त्यांच्या महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात सना शिंदेनं (Sana Shinde) काम केलं. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील सनाच्या अभिनयानं अनेकांनी कौतुक केलं. आज सनाचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सनाच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून केदार शिंदे यांनी सनाला मोदाचा सल्ला दिला आहे. सनाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "वाढदिवस शुभेच्छा... मोठी हो. यशस्वी हो. डोकं जमिनीवर आणि पाय जमिनीच्या आत राहू देत. यशात आणि अपयशात एकच लक्षात ठेव.. हे दिवसही सरतील. श्री स्वामी कृपा सदैव राहो. तेच सांभाळतील तुला. केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री अमृता खानविलकरनं देखील या पोस्टला कमेंट करुन सनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
केदार शिंदे यांचा 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट एप्रिल महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटामधील गाणी तसेच या चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय या सगळ्याच गोष्टींचे प्रेक्षकांनी कौतुक केले. या चित्रपटात सना शिंदे, अंकुश चौधरी, अतुल काळे, अमित डोलावत या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटात अंकुश चौधरीनं शाहीर साबळे यांची भूमिका साकारली असून अभिनेत्री सना शिंदेनं शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. आता सनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)