एक्स्प्लोर

Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा'चे स्पेशल स्क्रीनिंग; मुंबईच्या डबेवाल्यांनी लुटला चित्रपट पाहण्याचा आनंद!

16 डिसेंबर रोजी मुंबईत 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.

Baipan Bhaari Deva:  केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) चित्रपट सरत्या वर्षातला बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला मराठी चित्रपट ठरला. 'बाईपण भारी देवा' प्रदर्शित होऊन आता अनेक महिने लोटले तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही पुन्हा पुन्हा चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसत आहेत. खरंतर प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये 'बाईपण भारी देवा' विषयी कमालीची उत्सुकता पहायला मिळाली होती, बॉक्सऑफिसवर हा चित्रपट कमाल करेल अशी चर्चाही रंगली होती. आणि अगदी तसंच सगळं घडत गेलं. हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते मायबाप प्रेक्षकांमुळेच!
 
'बाईपण भारी देवा' या चित्रपटाचे यश साजरं करत निर्माती माधुरी भोसले यांच्यातर्फे  16 डिसेंबर रोजी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि संपूर्ण क्रू यावेळेस उपस्थीत होते. विशेष म्हणजे मुंबईचे डब्बेवाले आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून चित्रपट पाहण्यास आवर्जून उपस्थित होते.आनंदाची गोष्ट म्हणजे आताही हा विशेष शो हाऊसफुल ठरला होता!

Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा'चे स्पेशल स्क्रीनिंग; मुंबईच्या डबेवाल्यांनी लुटला चित्रपट पाहण्याचा आनंद!

'बाईपण भारी देवा' चित्रपटानं पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12.5 कोटींचा गल्ला जमवला होता. इतकंच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एका दिवसांत 6.10 कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता.  प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसातच 'बाईपण भारी देवा'नं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. 73 व्यां स्वातंत्र्यदिनी 76.5 कोटीचा गल्ला 2023 चा सुपरहीट चित्रपट ठरला आहे. आणि महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वाधिक कलेक्शन करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा'चे स्पेशल स्क्रीनिंग; मुंबईच्या डबेवाल्यांनी लुटला चित्रपट पाहण्याचा आनंद!
 
 शनिवारी पार पडलेल्या स्पेशल स्क्रिनिंगला तसेच चित्रपटाला एकंदरीत मिळालेल्या यशाबद्दल  निर्मात्या माधुरी भोसले म्हणतात की, " एमव्हीबी मीडियाच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळाले याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. त्याच बरोबर मला केदार शिंदे सारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक आणि या ६ अत्यंत प्रतिभावान आणि खास कलाकार महिलांशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांचे आणि क्रूचे मनापासून खूप खूप आभार. हे खरंच विशेष आहे की प्रचंड व्यावसायिक यशासोबतच आम्ही ज्यांच्यासाठी ही फिल्म बनवली आहे त्यांच्याकडूनही तितकेच कौतुक आणि प्रेम मिळाले आहे!! धन्यवाद.'बाईपण भारी देवा' चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट पहायला मिळाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Embed widget