Exclusive | फेक फॉलोवर केस प्रकरणात रॅपर बादशाहची मुंबई गुन्हे शाखेकडून चार तास चौकशी
फेक फॉलोवर केस प्रकरणात रॅपर बादशाहची मुंबई गुन्हे शाखेकडून 4 तास चौकशी करण्यात आली. सोशल मीडियावर गैरप्रकारे फॉलॉवर वाढवण्याचं एक रॅकेट उघडकीस आले आहे.
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटकडून सोशल मीडियावर गैरप्रकारे फॉलोवर वाढवण्याचं एक रॅकेट उघडकीस करण्यात आलं होतं. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटकडून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील काही लोकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याच प्रकरणात आज रॅपर बादशाहची 4 तास चौकशी करण्यात आली. 7 ऑगस्टला 12 वाजता त्याला पुन्हा बोलवण्यात आलं आहे.
बादशाहचा इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ आहे, ज्याच्यावर लाखोंच्या संख्येत त्याला लाइक्स आणि व्युज मिळाले आहेत. कुठल्या दिवशी हजारोंच्या संख्येने तर एखाद्या दिवशी लाखोंच्या संख्येने या व्हिडिओवर लाइक्स मिळाले आहेत. बादशाहाकडून गुन्हे शाखेला 238 प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत, जी त्यांना या तपासामध्ये मदत करतील.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे स्वतः या प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहेत, या प्रकरणामध्ये काही पीआर एजन्सिज आहेत, जे असे फेक लाईक्स आणि व्युज काही बड्या व्यक्तींना पुरवण्याचं काम करत असतात. या एजन्सीजवर सुद्धा क्राइम ब्रांचची करडी नजर आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.
सोशल मीडिया स्कॅममध्ये मुंबई क्राईम ब्रांचने काशीफ मनसूर (वय 30) ला अटक केली होती. तो पेशाने एक सिव्हिल इंजिनियर आहे. www.amvsmm.com या वेबसाईट वरुन काशिफ मनसूर हा गोरख धंदा चालवत होता. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक अशा विविध सोशल मीडियावर सिनेमा, स्पोर्ट्स आणि इतर क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे प्रोफाईल हॅक करून फेक लाईक्स आणि फॉलोवर्स पुरवण्याचं काम करत होता.
काशिफ मनसुरने सोशल मीडियावर लाईक आणि कमेंटच्या 25 हजारच्या ऑर्डर पूर्ण केल्या असून दोन कोटी तीन लाख फॉलोअर्स त्याने अवैधरित्या वाढवले होते.
काय आहे प्रकरण?
बॉलिवूडमधील प्ले बॅक सिंगर भूमि त्रिवेदीने मुंबई क्राईम ब्रँचमध्ये तक्रार नोंदवली होती की तिचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल रॅकेटचा एक सदस्य अभिषेख दौडे (वय 21 वर्ष) याला अटक करण्यात आली होती.
विकास दौडे हा इंटरनॅशनल रॅकेटचा सदस्य होता. जो एका सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या माध्यमाने बड्या लोकांचे बनावट प्रोफाईल बनवून त्यांचे चुकीचे स्टॅटिस्टिक, परफॉर्मन्स आणि खोट्या कमेंटच्या माध्यमाने लोकांची दिशाभूल करायचा आणि त्यावर लाखो लाईक, व्युज आणि रिव्यू कमेंट तयार करायचा, ज्यामुळे लोकांची दिशाभूल व्हायची.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून रिया चक्रवर्तीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
क्राईम ब्रांचच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटने जेव्हा याचा तपास सुरू केला तेव्हा कळलं की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून खोटे प्रोफाईल बनवून लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचवली जात होती. ज्याच्यावर लाखो लाईक्स आणि कमेंट येत होते तर काही खोट्या पोस्ट सुद्धा करण्यात आल्या होत्या. त्याच्यामुळे समाजामध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण होतं. याच्या व्यतिरिक्त अशाच प्रकारे खोटे प्रोफाइलच्या माध्यमातून कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटीजना संपर्क करण्यात आला होता. ज्याने सेलिब्रिटीजच्या कमेंटने अशा खोट्या बातम्या अधिक जलद गतीने पसरवण्यास मदत झाली असती. जास्त लाईक्स आणि कमेंट बघून लोकांची दिशाभूल करणे सोपं होतं. अभिषेख दौडे यानी 176 खोटे प्रोफाइल बनवले होते, ज्याच्यावर कोटींच्या घरात फॉलवर होते.
CBI Probe SSR Case | सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण अखेर सीबीआयच्या हातात, विशेष गुन्हा शाखा तपास करणार