एक्स्प्लोर

Varun Dhawan Baby Jonn Look :  'जवान'नंतर अॅटली वरुण धवनसह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार; पाहा 'बेबी जॉन'चा खतरनाक फर्स्ट लूक

Varun Dhawan Baby Jonn Look :  बेबी जॉन या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात वरूण धवनची मुख्य भूमिका आहे. टिझरमध्ये वरूणचा खतरनाक लूक दिसून आला आहे.

Varun Dhawan Baby Jonn Look :  सध्या रुपेरी पडद्यावर अॅक्शन चित्रपटांची लाट आली आहे. बॉक्स ऑफिसवर अॅक्शनपट धुमाकूळ घालत आहेत. बॉक्स ऑफिसवर कमाईचा डोंगर रचणारा दिग्दर्शक अॅटली आता पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यास सज्ज झाला आहे. बेबी जॉन ( Baby Jonn) या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात  वरूण धवनची (Varun Dhawan) मुख्य भूमिका आहे. या 60 सेकंदाच्या व्हिडीओत वरूण धवनचा लूक अंगावर काटे आणणारा आहे. अॅटली या चित्रपटाचा सादरकर्ता आहे. या चित्रपटात वरुण धवनसह कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) आणि वामिका गब्बी (Wamiqa Gabbi ) यांच्याही भूमिका आहेत. बॉलिवूड आणि टॉलीवूड सिनेसृष्टीचा हा तडका  2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर कमाल करणार असल्याचे बोलले जात आहे. 

वरुण धवन बऱ्याच काळानंतर 'बेबी जॉन'मध्ये दमदार ॲक्शन अवतारात दिसणार आहे. फर्स्ट लूक व्हिडिओमध्ये त्याची स्टाइल  खतरनाक आणि अॅग्रेसिव्ह आहे. यापूर्वी या चित्रपटाचे नाव ठरले नव्हते. त्यामुळे VD18 म्हणून त्याची जाहिरात केली जात होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुणच्या पायाला दुखापत झाली होती.

एटलीची पत्नी आणि निर्माती प्रियाने केली रिलीजची घोषणा

एटलीची पत्नी प्रिया एटलीने इन्स्टाग्रामवर बेबी जॉनच्या नावाची घोषणा करताना व्हिडीओ पोस्ट केला. कॅप्शनमध्ये  2024 मधील सर्वात मोठा अॅक्शन एंटरटेनर BabyJohn. असल्याचे म्हटले. या चित्रपटात वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी असल्याचेही प्रियाने व्हिडीओ कॅप्शन मध्ये म्हटले. हा चित्रपट 31 मे  रोजी प्रदर्शित होणार असल्याचे प्रिया अॅटलीने म्हटले. 

View this post on Instagram
 
A post shared by Atlee Kumar (@atlee47)

धडकी भरवणारा वरूणचा 'बेबी जॉन' लूक 

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वरुण धवन दमदार बॅकग्राउंड म्युझिकवर हाय-ऑक्टेन ॲक्शन करताना दिसत आहे. यामध्ये तो सिंहासनावर बसलेला पक्षी हातात घेऊन धडकी भरवणारा लूक दिसत आहे, तर दुसऱ्याच क्षणी तो गोळ्या झाडत आहे. 'जवान'च्या बंपर यशानंतर ॲटली आणि वरुण धवनच्या या चित्रपटाची बरीच चर्चा झाली.

बेबी जॉनचा दिग्दर्शक कोण?

बेबी जॉन चित्रपट हा एटली प्रस्तुतकर्ता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. कालीस्वरन यांनी केले आहे.तर, मुराद खेतानी, प्रिया अॅटली आणि ज्योती देशपांडे यांनी चित्रपट निर्माती केली आहे. हा चित्रपट जिओ स्टुडिओज,अॅटलीच्या ए फॉर अॅप्पल स्टुडिओज आणि सिने1 स्टुडिओजच्या बॅनर अंतर्गत निर्मिती झाली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जण पोलिसांच्या ताब्यात, आरोपींमध्ये काही मास्तरांचाही समावेश
कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जण पोलिसांच्या ताब्यात, आरोपींमध्ये काही मास्तरांचाही समावेश
Hasan Mushrif: तो सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? खैर केली जाणार नाही, तुमचं भविष्य संकटात येणार; हसन मुश्रीफांचा थेट 'अजितदादा स्टाईल'ने धमकीवजा इशारा
तो सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? खैर केली जाणार नाही, तुमचं भविष्य संकटात येणार; हसन मुश्रीफांचा थेट 'अजितदादा स्टाईल'ने धमकीवजा इशारा!
Prashant Kishor: आव्हान, प्रतिआव्हान देऊनही बिहारी निवडणुकीत पदरी घोर निराशा; अखेर प्रशांत किशोरांनी निर्णय घेतलाच!
आव्हान, प्रतिआव्हान देऊनही बिहारी निवडणुकीत पदरी घोर निराशा; अखेर प्रशांत किशोरांनी निर्णय घेतलाच!
Karnataka Congress Crisis: 'गटबाजी माझ्या रक्तात नाही, सर्व 140 आमदार माझे आहेत..' जिद्दीला पेटलेल्या डीके शिवकुमारांनी डरकाळी फोडताच सिद्धरामय्यांचा तगडा निर्णय
'गटबाजी माझ्या रक्तात नाही, सर्व 140 आमदार माझे आहेत..' जिद्दीला पेटलेल्या डीके शिवकुमारांनी डरकाळी फोडताच सिद्धरामय्यांचा तगडा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Stree Mukti Sanghatana Majha Katta : स्त्री मुक्ती संघटनेच्या रणरागिणी 'माझा कट्टा'वर
Naxal Gadchiroli : आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दांपत्याच्या घरी नवा पाहुणा Special Report
Smriti Mandhana Marriage : स्मृती -पलाशच्या लग्नाची सांगलीत लगबग Special Report
Pune Police : पुणे पोलिसांचा इंगा, मध्यप्रदेशात डंका Special Report
Delhi Blast : जिहादी डॉक्टरांच्या टोळीचं भयंकर कारस्थान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जण पोलिसांच्या ताब्यात, आरोपींमध्ये काही मास्तरांचाही समावेश
कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जण पोलिसांच्या ताब्यात, आरोपींमध्ये काही मास्तरांचाही समावेश
Hasan Mushrif: तो सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? खैर केली जाणार नाही, तुमचं भविष्य संकटात येणार; हसन मुश्रीफांचा थेट 'अजितदादा स्टाईल'ने धमकीवजा इशारा
तो सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? खैर केली जाणार नाही, तुमचं भविष्य संकटात येणार; हसन मुश्रीफांचा थेट 'अजितदादा स्टाईल'ने धमकीवजा इशारा!
Prashant Kishor: आव्हान, प्रतिआव्हान देऊनही बिहारी निवडणुकीत पदरी घोर निराशा; अखेर प्रशांत किशोरांनी निर्णय घेतलाच!
आव्हान, प्रतिआव्हान देऊनही बिहारी निवडणुकीत पदरी घोर निराशा; अखेर प्रशांत किशोरांनी निर्णय घेतलाच!
Karnataka Congress Crisis: 'गटबाजी माझ्या रक्तात नाही, सर्व 140 आमदार माझे आहेत..' जिद्दीला पेटलेल्या डीके शिवकुमारांनी डरकाळी फोडताच सिद्धरामय्यांचा तगडा निर्णय
'गटबाजी माझ्या रक्तात नाही, सर्व 140 आमदार माझे आहेत..' जिद्दीला पेटलेल्या डीके शिवकुमारांनी डरकाळी फोडताच सिद्धरामय्यांचा तगडा निर्णय
Dhule Crime: धुळ्यात संतापजनक घटना, चोरीच्या संशयावरुन चिमुकल्याला बैलगाडीला बांधून खालून जाळ लावला, लेकराची पाठ होरपळली, पोलिसांकडून दोघांना अटक
धुळ्यात संतापजनक घटना, चोरीच्या संशयावरुन चिमुकल्याला बैलगाडीला बांधून खालून जाळ लावला, लेकराची पाठ होरपळली, पोलिसांकडून दोघांना अटक
Nagpur Crime News: आत्याच्या घरी लग्नाची घाई; कुटुंबीय तयारीत मग्न, 13 वर्षीय अल्पवयीन मुलीनं घरात जाऊन गळ्याला दोर लावला
आत्याच्या घरी लग्नाची घाई; कुटुंबीय तयारीत मग्न, 13 वर्षीय अल्पवयीन मुलीनं घरात जाऊन गळ्याला दोर लावला
PHOTOS: वाढदिवसाची सुरुवात बाप्पांच्या चरणी; अमृता खानविलकरने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
वाढदिवसाची सुरुवात बाप्पांच्या चरणी; अमृता खानविलकरने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
Ind vs Sa 2nd Test : घर पे खेल रहे हो क्या...; अंपायरची वॉर्निंग, कर्णधार ऋषभ पंतचा पारा चढला, कुलदीप यादवला नको नको ते बोलला, नेमकं काय घडलं? पाहा Video
घर पे खेल रहे हो क्या...; अंपायरची वॉर्निंग, कर्णधार ऋषभ पंतचा पारा चढला, कुलदीप यादवला नको नको ते बोलला, नेमकं काय घडलं? पाहा Video
Embed widget