एक्स्प्लोर

‘सलमान खान ड्रग्ज घेतो, आमिरबद्दल माहिती नाही आणि अभिनेत्री तर...’; बाबा रामदेव यांची बॉलिवूडवर जहरी टीका!

Baba Ramdev : नुकतेच बाबा रामदेव मुरादाबाद येथे पार पडलेल्या आर्यवीर महासंमेलनाच्या व्यासपीठावरून लोकांना अंमली पदार्थांपासून मुक्त होण्याचे आवाहन करताना दिसले.

Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. नुकतेच बाबा रामदेव मुरादाबाद येथे पार पडलेल्या आर्यवीर महासंमेलनाच्या व्यासपीठावरून लोकांना अंमली पदार्थांपासून मुक्त होण्याचे आवाहन करताना दिसले. दरम्यान, त्यांनी आपल्या भाषणात बॉलिवूड स्टार्सवरही जोरदार टीका केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर त्यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी अनेक बड्या कलाकारांचं नाव घेत टीकास्त्र सोडलं आहे.

‘सलमान (Salman Khan) ड्रग्ज घेतो, आमिरबद्दल (Aamir Khan) मला माहित नाही. तर, देवच बॉलिवूड अभिनेत्रींचा मालक आहे’, असं वक्तव्य त्यांनी या मंचावरून केलं. बाबा रामदेव म्हणाले की, शाहरुखचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला, त्यासाठी तो तुरुंगात गेला. सलमान खानही ड्रग्ज घेतो. आमिर खान ड्रग्ज घेतो की, नाही हे मला माहीत नाही. संपूर्ण बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे.

संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीवर आरोप

आर्यवीर महासंमेलनात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील मुरादाबादला पोहोचले होते. त्यांच्या आधी याच ठिकाणी बाबा रामदेव यांची परिषद आणि एक व्याख्यानपार कार्यक्रम झाला होता. व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करतानाच, व्यसनमुक्तीसाठी स्वतःला वेळ द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी बॉलिवूडचे नाव घेत, काही कलाकारांवर टीका केली. बाबा रामदेव यांनी शाहरुख खान आणि सलमानचे उदाहरण देत फिल्म इंडस्ट्रीवर ड्रग्ज सेवनाचा आरोप केला. सध्या बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात सतत नवनवीन माहिती समोर येत असते. अनेक कलाकारांची नावे ड्रग्ज प्रकरणात अडकली आहेत.

विडी, सिगारेट, दारू सोडण्याचे आवाहन

बाबा रामदेव यांनी पुढे सांगितले की 'एक निश्चय आपणही केला पाहिजे की, संपूर्ण भारत भूमी ही ऋषीमुनींची भूमी आपण पूर्णपणे नशामुक्त केली पाहिजे. त्याची समाजाला गरज आहे. यामुळे लहान मुलं आणि विद्यार्थी यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.’ त्यामुळे आजच विडी, सिगारेट, दारू सोडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बाबा रामदेव म्हणाले की, मी कुंभमध्ये चिलीम सोडण्याची मोहीम सुरू केली होती. साधूंना असे आवाहन केले की, तुम्हाला सर्व काही मिळेल. पण, ही चिलीम सोडा. बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, यानंतर शेकडो साधूंनी त्यांची चिलीम रामदेव बाबा यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या आणि म्हटले होते की, बाबाजी आजपासून आम्ही चिलीम ओढणार नाही.’

हेही पाहा :

Ramdev Baba On Bollywood : Salman Khan ड्रग्ज सेवन करतो,रामदेव बाबा यांचा बॉलिवूडवर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget