एक्स्प्लोर
बाहुबली 2 च्या प्रदर्शनाची तारीख बदलली

नवी दिल्ली : बाहुबलीचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2015 सालची ब्लॉक बस्टर मुव्ही ठरलेल्या बाहुबलीचा पुढचा भाग कधी रिलीज होणार याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहात होते. "बाहुबली : द कन्लूजन" या नावाने हा सिनेमा 28 एप्रिल 2017 दिवशी रिलीज होणार आहे.
धर्मा प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा आणि बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. बाहुबलीच्या हिंदी डबचे हक्क धर्मा प्रॉडक्शनकडे राखीव आहेत. धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता आणि करण जोहर यांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली.
https://twitter.com/karanjohar/status/761445343212949504
28 एप्रिल रोजी फिल्म रिलीज होईल आणि कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचाही उलगडा त्याच दिवशी होईल अशी माहिती अपूर्व यांनी दिली आहे.
या फिल्मच्या क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू असून यात अर्ध्या तासाचे युद्धही दाखवण्यात येणार आहे. अर्का मीडिया वर्क्सच्या बॅनरखाली या फिल्मची निर्मिती होणार असून राणा डग्गुबाती, प्रभाष, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया मुख्य भुमिकेत दिसतील. या फिल्मचे दिग्दर्शक एस.एस.राजमौली आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
मुंबई
नाशिक
Advertisement
Advertisement


















