एक्स्प्लोर
भल्लालदेवला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं!
![भल्लालदेवला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं! Baahubali Fame Rana Daggubati Is Blind From One Eye भल्लालदेवला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/01085226/rana-daggubati.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बाहुबली- 2 या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र त्याचबरोबर या सिनेमात भल्लालदेवची भूमिका साकारणाऱ्या राणा दग्गुबाती या कलाकाराच्या डोळ्याचीही चर्चा आता होऊ लागली आहे. भल्लालदेव अर्थात राणाचा एक डोळा पूर्णपणे अधू असून, त्याला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं.
मात्र, सिनेमात किंवा ऑफ स्क्रिन तुम्हाला त्याच्याकडे पाहिल्यावर याची जाणीव होणार नाही. पण याबद्दल राणा सांगतो की, अशाप्रकारच्या व्यंगामुळे आयुष्यात न डगमगता पुढे गेलं पाहिजे.
अनेक वर्षांपूर्वी राणा दग्गुबातीला हा डोळा एका व्यक्तीनं मृत्यूपश्चात दान केला होता. मात्र त्या डोळ्याला दृष्टी मिळू शकली नाही. एका तेलगू वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबातीनंच ही माहिती दिली आहे.
बाहुबली-2 सिनेमातील भल्लादेवची भूमिका साकरणारा अभिनेता राणा दग्गुबाती संपूर्ण देशातच नव्हे, तर परदेशातही तितकाच लोकप्रिय झाला आहे. यापूर्वी कधीच प्रादेशिक भाषेतील सिनेमाच्या प्रदर्शनासाठी सिनेरसिकांमध्ये उत्सुकता नव्हती.
पण कट्टाप्पाने बाहुबलीला का मारलं? या एकाच प्रश्नामुळे प्रादेशिक भाषेतील सिनेमाच्या प्रदर्शनासाठी सिनेरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. बाहुबलीचा दुसरा भाग पाहिल्यानंतर सोशल मीडियात सिनेरसिकांमध्येही कमालीची चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या
'कटप्पा-बाहुबलीचं कोडं सुटलं, पण मुंबईकर ट्रॅफिकचे नियम का पाळत नाही?'
‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई
मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन
उस्मानाबादेत टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2, तिकीट अवघं..
अंडरटेकरची भेट, ते मानधन, ‘बाहुबली’च्या 15 फॅक्ट्स !
‘बाहुबली 2’ पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)