एक्स्प्लोर

बाहुबलीला मरण्यासाठी 25 कोटी रुपये तर कटप्पाला केवळ....!

मुंबई : बॉक्स ऑफिसवर यशाची आणि कमाईची शिखरं पादाक्रांत करणारा एस एस राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली - द कन्क्लुजन' संदर्भात एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सिनेमातील कलाकारांनी या चित्रपटासाठी किती फी आकारली याचा उल्लेख व्हिडीओमध्ये आहे. 30 एप्रिल रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत 45 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. दरम्यान, एबीपी माझा डॉट इनने ह्या व्हिडीओची पडताळणी केलेली नाही. Prabhas पीळदार शरीरयष्टी, भारदस्त, पराक्रमी, हुशार तेवढाच प्रेमळ, मोठ्या पडद्यावर असा बाहुबली साकारणाऱ्या प्रभासने सिनेमासाठी तब्बल 25 कोटी रुपये घेतले आहेत. Rana धिप्पाड देह, डोळ्यात द्वेष, कारस्थानी माहिष्मतीची महाराज बनण्याचं एकमेव ध्येय असलेला भल्लादेवही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. भल्लालदेवची भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबतीने या चित्रपटासाठी 15 कोटी रुपये घेतल्याचं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. Tamanna_1 तर सिनेमात अवंतिकाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या तमन्ना भाटियाने सिनेमाचा भाग बनण्यासाठी निर्मात्यांकडून 5 कोटी रुपये घेतले. Anushka 'बाहुबली - द कन्क्लुजन'मध्ये अमरेंद्र बाहुबलीएवढीच छाप पाडणारी देवसेना अर्थात अनुष्का शेट्टीनेही सिनेमासाठी 5 कोटी रुपये आकारले. Sathyaraj सिनेमातील महत्त्वाची आणि सर्वाधिक चर्चेत असलेली व्यक्तिरेखा म्हणजे कटप्पा. कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या भागात मिळालं. पण कटप्पाची भूमिका साकारणाऱ्या सत्यराज यांनी कटप्पाच्या व्यक्तिरेखेसाठी किती रुपये आकारले याचं उत्तर व्हिडीओमध्ये आहे. सत्यराज यांनी सिनेमासाठी 2 कोटी रुपयांचं मानधन घेतलं. Ramya तर महत्त्वाकांक्षी राजमाता शिवगामीची भूमिका साकारणाऱ्या रम्या कृष्णाने 'बाहुबली - द कन्क्लुजन' साठी अडीच कोटी रुपये घेतले. Rajamaouli पण या सगळ्यात एक अशी व्यक्ती आहे, जिने सिनेमात काम करण्यासाठी सर्वाधिक पैसे घेतले आहेत. ती व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक एस एस राजामौली. होय, राजामौली यांनी सिनेमासाठी सर्वाधिक 28 कोटी रुपये फी घेतली आहे. 'बाहुबली द कन्क्लुजन’ने चार दिवसात केवळ हिंदी भाषेत 168.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकेंडला जबरदस्त गल्ला जमवल्यानंतर सोमवारीही सिनेमाने 40.25 कोटींची विक्रमी कमाई केली. सोमवारी एवढी कमाई करणारा हा पहिलाच हिंदी भाषेत डब करण्यात आलेला सिनेमा आहे. पाहा व्हिडीओ संबंधित बातम्या : सर्व विक्रम मोडीत, ‘बाहुबली 2’ ची विकेंडला ऐतिहासिक कमाई बाहुबली बनवणारे राजमौली कोण? मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन ‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी! ‘बाहुबली 2’ चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो… ‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Embed widget