एक्स्प्लोर
अभिनेत्री आयेशा टाकियाला जीवे मारण्याची धमकी
आयेशा टाकियाचे पती फरहान आझमी यांनी मुंबई पोलिसांकडे ट्विटरवरुन तक्रार केली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकियाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आयेशाचे पती फरहान आझमी यांनी मुंबई पोलिसांकडे ट्विटरवरुन तक्रार केली आहे.
'माझी पत्नी आयेशा, आई आणि बहीण यांना एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असून त्यांचा पाठलागही केला जात आहे. पोलिसांकडे तक्रार करुनही डीसीपी दहिया यांनी दुर्लक्ष केलं. माझे कॉल, मेसेज यांना ते उत्तर देत नाहीत. दहियांनी आमची बँक खाती गोठवली आहेत. नरेंद्र मोदी, सुषमा स्वराजजी कृपया लक्ष द्या' असं ट्वीट फरहान आझमी यांनी केलं आहे.
आरोपी अभिनेत्री आयेशा टाकियाला व्हॉट्सअॅपवरुन धमकावत असल्याचा दावा फरहान यांनी केला आहे. 'तू आणि तुझा नवरा लवकरच तुरुंगात जाल. दहा दिवसात पोलिस तुमची धरपकड करतील.' अशा आशयाचे मेसेज आयेशाला केले जात असल्याचं म्हटलं जातं. फरहान यांच्या गर्भवती बहिणीलाही त्रास दिला जात आहे. फरहान यांच्या ट्वीटची मुंबई पोलिसांनी दखल घेतल्याने फरहान यांनी आभारही व्यकMy wife @Ayeshatakia , mother & sisters are being harassed,threatened stalked by a litigant, @MumbaiPolice #dcpDahiya refusing to answer my calls or messages. #DahiyaIPS has illegally frozen our bank accounts Dear PM @narendramodi ji @SushmaSwaraj Pls intervene!! #betibachao
— Farhan Azmi (@abufarhanazmi) July 3, 2018
फरहान आझमी हे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र आहेत. फरहान आणि आयेशा यांचं लग्न 2009 मध्ये झालं होतं.Thank you @DevenBhartiIPS Ji #MumbaiPolice for stepping in. I trust the Mumbai Police. 3 rotten apples cannot spoil #theappletree 🍎 @CPMumbaiPolice @MumbaiPolice
— Farhan Azmi (@abufarhanazmi) July 3, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement