Avatar 2 : 'अवतार 2'चा रिलीज आधीच रेकॉर्ड; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तीन दिवसात 15 हजारहून अधिक तिकीट विक्री
Avatar : 'अवतार 2' या बहुचर्चित सिनेमाने रिलीजआधीच तीन दिवसांत 15 हजारापेक्षा अधिक तिकीटांची विक्री केली आहे.
Avatar: The Way of Water : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar: The Way of Water) या बहुचर्चित हॉलिवूड सिनेमाची सिनेरसिक गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे.
'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून या सिनेमाने तीन दिवसांत 15 हजारापेक्षा अधिक तिकीटांची विक्री केली आहे. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा हॉलिवूड सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होणार असला तरी आत्तापासूनच या सिनेमाची क्रेझ सिनेप्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
बॉक्स ऑफिसवर सुगीचे दिवस
'अवतार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस राहिले असून हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा सुगीचे दिवस येणार आहेत.
'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा येत्या 16 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निळ्या रंगाच्या प्राण्यांच्या विश्वावर आधारित या सिनेमाची कथा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल. तब्बल 13 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा भारतात हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' नंतर अवतारचे आणखी तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. निळ्या विश्वाची जादू पाहण्यासाठी भारतातील लहान मुलंदेखील उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या