Asha Parekh On Pathaan : "आपले विचार खूप संकुचित होतायत"; 'पठाण'च्या वादादरम्यान आशा पारेख यांचं वक्तव्य
Asha Parekh : 'पठाण' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता यावर बॉलिवूड अभिनेत्री आशा पारेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Asha Parekh On Pathaan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या सिनेमातील 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाच्या (Deepika Padukone) बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. आता यावर गेली अनेक दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आशा पारेख म्हणाल्या,"बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीला विरोध होणं ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे. लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. आपले विचार खूप संकुचित होत आहेत.
'पठाण' या सिनेमाची निर्मिती 250 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. हा सिनेमा 8 भाषांमध्ये शूट झाला आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तानमध्ये याचे चित्रीकरण झाले आहे.
View this post on Instagram
चार वर्षांनी शाहरुखचं कमबॅक!
शाहरुख चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. नुकतीच त्याची एक झलक आलिया-रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसली होती. सध्या तो त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. एकीकडे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तर दुसरीकडे या सिनेमाची शाहरुखचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'पठाण'सह शाहरुख 'जवान' आणि 'डंकी' या सिनेमातदेखील झळकणार आहे.
शाहरुख खानने 1992 साली 'दीवाना' (Deewana) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'डर', 'बाजीगर' आणि 'अंजाम' या सिनेमांत तो खलनायकच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला पण दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ) या सिनेमांत त्याचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळाला. किंग खानने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. गेली तीन दशके तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
संबंधित बातम्या