एक्स्प्लोर

पैसे घेऊनही थियटर्स दिले नाही, कॉलेज डायरी सिनेमाच्या कलाकारांचा वितरकांना चोप

कॉलेज डायरी सिनेमाला थिअटर्स न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता असलेले अनिकेत घाडगे यांचं म्हणणं आहे. दरम्यान याविरोधात दोघांकडूनही अद्याप पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

पुणे : नुकतंच प्रदर्शित झालेला कॉलेज डायरी हा सिनेमा जितक्या थिएटर्समध्ये प्रदर्शित होणं अपेक्षित होतं तितक्या थिएटर्समध्ये प्रदर्शित न झाल्याने कलाकारांनी वितरकांना चांगलाच चोप दिला आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर हा प्रकार घडला. या चित्रपटाचे कलाकार आविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांनी वितरक योगेश गोसावी आणि विशाल सांगळे यांना भर रस्त्यावर चोप दिला. कॉलेज डायरी सिनेमाला थिअटर्स न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता असलेले अनिकेत घाडगे यांचं म्हणणं आहे. दरम्यान याविरोधात दोघांकडूनही अद्याप पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कॉलेज डायरी हा सिनेमा गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा सिनेमा राज्यातील 100 थिएटर्समध्ये दाखविण्याचे आश्वासन वितरक असलेल्या योगेश गोसावी आणि सचिन पारेकर यांनी निर्मात्यांना दिले होते. तसेच त्याबाबतचे पैसे देखील घेतले होते. प्रत्यक्षात हा सिनेमा केवळ 45 थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे. तसेच चित्रपटाला योग्य वेळा न दिल्याने चित्रपट लोकांपर्यंत पोहोचलं नसल्याचं देखील घाडगे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आज या रागातून सिनेमातील कलाकार अविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांनी वितरकांना चांगलाच चोप दिला. कॉलेज डायरीच्या निर्मत्यांनी घर आणि शेत विकून 10 लाख रुपये वितरकाला दिले होते, असं त्यांच म्हणणं आहे. यावेळी नव्याने चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांनी अशा वितरकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहन कलाकार अविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांनी केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहनRaosaheb Danve on Jalna Loksabha : 4 लाख मतांनी निवडणूक जिंकून येईल, रावसाहेब दानवेंना विश्वासAllu Arjun Hyderabad voting : चौथ्या टप्प्यातील मतदान, अल्लू अर्जूनने बजावला मतदानाचा हक्कShirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget