एक्स्प्लोर
Advertisement
अर्जुन रामपालने कॅमेरा फेकून मारला, तरुणाची पोलिसात तक्रार
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल अडचणीत येण्याची शक्यता आहे. अर्जुनने आपल्याला कॅमेरा फेकून मारल्यामुळे दुखापत झाल्याची तक्रार एका तरुणाने दिल्ली पोलिसात दाखल केली आहे.
दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शनिवारी रात्री पार्टी होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक अर्जुनने प्रेक्षकांच्या दिशेने कॅमेरा भिरकावला, तो मला लागून दुखापत झाली, असा दावा शोबित नामक तरुणाने केला आहे.
'त्याने कॅमेरा का फेकला, मला माहित नाही. मी पोलिसात तक्रार दाखल केली असून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. पोलिसांना एफआयआर दाखल केलेला नाही.' असंही तक्रारकर्त्याने म्हटलं आहे.
शांग्रि-लाच्या इरॉस हॉटेलमधील क्लब प्राईव्हीमध्ये अर्जुन रामपाल डीजे म्हणून काम करत होता. त्यावेळा एका फोटोग्राफरने त्याचा फोटो काढायचा प्रयत्न केला असता अर्जुन संतापला. त्याचा कॅमेरा हिसकावून त्याने डान्स फ्लोअरवर नाचणाऱ्या प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावला. यामध्ये शोबित जखमी झाल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement