एक्स्प्लोर

गेल्या 22 वर्षांचा तिरस्कार विसरुन अर्जुन कपूर कुटुंबासोबत!

श्रीदेवीच्या निधनाची माहिती मिळताच अर्जुन कपूर वडिलांना आधार देण्यासाठी दुबईला रवाना झाला.

मुंबई : श्रीदेवी यांच्या चाहत्यांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून लाखो चाहते मुंबईत दाखल झाले आहेत. अंधेरीच्या सेलिब्रेशन क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पार्ल्याच्या स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. आपल्या दमदार अभिनयाने श्रीदेवीने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं. मात्र एक व्यक्ती अशीही होता, ज्याचं मन श्रीदेवी कधीही जिंकू शकली नाही आणि ही व्यक्ती श्रीदेवीविषयीचा तिरस्कार कधी कमीही करु शकला नाही. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अर्जुन कपूर आहे. श्रीदेवीच्या निधनाची माहिती मिळताच अर्जुन कपूर वडिलांना आधार देण्यासाठी दुबईला रवाना झाला. श्रीदेवीचं पार्थिव दुबईहून मुंबई विमानतळावर आणि तिथून निवासस्थानी आणण्यात आलं. यादरम्यान प्रत्येक क्षणाला अर्जुन कपूर त्याचे वडिल बोनी कपूर यांच्यासोबत होता. वेळेनुसार माणसाच्या मनातला तिरस्कार कमी होतो, असं म्हणतात. मात्र गेल्या 22 वर्षांपासून अर्जुन कपूरच्या मनात श्रीदेवीविषयी जो तिरस्कार होता, तो कधीही कमी झाला नाही. अर्जुन कपूर 11 वर्षांचा असताना बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी अर्जुनची आई मोना कपूर यांच्याशी घटस्फोट घेतला होता. तेव्हापासून अर्जुन कपूरच्या मनात श्रीदेवीविषयी फक्त आणि फक्त तिरस्कार होता. मात्र श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन कपूर त्याचे वडिल बोनी कपूर यांच्यासोबत प्रत्येक क्षणाला उपस्थित होता. श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खुशी यांच्यासोबत आपण ना कधी बोलतो, ना कधी वेळ घालवतो, असं अर्जुन कपूरने गेल्या वर्षी मे महिन्यात एका मुलाखतीत सांगितलं होतं. ''श्रीदेवी आणि तिच्या दोन्ही मुली यांचा माझ्या आयुष्याशी काहीही संबंध नाही आणि माझ्यासाठी श्रीदेवी फक्त वडिलांची पत्नी आहे, त्यापलिकडे काहीही नाही,'' असंही अर्जुन म्हणाला होता. बोनी कपूर यांनी दोन लग्न केले होते. पहिलं लग्न मोना कपूर यांच्याशी केलं. मोना यांना दोन मुलं होती, त्यापैकी एक अर्जुन कपूर आहे, तर अर्जुनच्या बहिणीचं नाव अंशुला आहे. श्रीदेवीला दोन मुली आहेत, ज्यांचं नाव जान्हवी आणि खुशी आहे. काळाने या नात्यातला दुरावा कमी केला. अर्जुन त्याचे वडिल बोनी कपूर यांच्या जवळ तर आला, मात्र श्रीदेवीशी त्याचे संबंध कधीही सुधारले नाही. अर्जुन कपूरने श्रीदेवीला कधीही आईचा दर्जा दिला नाही किंवा आई म्हणून हाकही मारली नाही. मात्र श्रीदेवीच्या निधनाची माहिती मिळताच तो वडिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला.

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
Embed widget