Arijit Singh: छत्रपती संभाजीनगरमधील कॉन्सर्टदरम्यान अरिजित सिंहला झाली दुखापत; चाहत्यानं ओढला हात, व्हिडीओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगरमध्ये अरिजितच्या (Arijit Singh) लाईव्ह कॉन्सरचे आयोजन करण्यात आले होते.
Arijit Singh: बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंह (Arijit Singh) हा त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. अरिजित विविध शहरांमध्ये कॉन्सर्टसाठी जात असतो. अरिजितचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) अरिजितच्या लाईव्ह कॉन्सरचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टदरम्यान एक घटना घडली. अरिजितच्या एका चाहत्यानं त्याचा हात ओढला. यामुळे अरिजित जखमी झाला आहे. या कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कॉन्सर्टमध्ये ज्या फॅननं अरिजितचा हात ओढला त्या फॅनसोबत अरिजित बोलत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील कॉन्सर्टदरम्यान हात ओढणाऱ्या फॅनवर अरिजित भडकला नाही. कॉन्सर्टमधील एका व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अरिजित हा त्या चाहत्यासोबत शांतपणे बोलत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अरिजित म्हणतो, 'माझे ऐका, तुम्हाला मजा येत आहे, ते ठीक आहे, पण जर मी परफॉर्म करू शकलो नाही, तर तुम्हाला मजा कशी येणार? तुम्ही प्रौढ व्यक्ती आहात ना? तुम्ही माझा हात का ओढला? माझा हात आता थरथरत आहे.' त्यानंतर अरिजितच्या त्या फॅननं अरिजितची माफी मागितली.
पाहा व्हिडीओ:
Arijit Singh was injured during his concert in Aurangabad after a fan of his pulled his hand. #ArijitSingh #ArijitSinghLive #Arijit #Injured #viralvideo #ViralVideos #viral2023 #India pic.twitter.com/XVVqz0n1CC
— Anjali Choudhury (@AnjaliC16408461) May 8, 2023
सध्या अरिजितचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, अरिजितच्या हाताला दुखापत झाली आहे.
Dada got injured in #Aurangabad concert. Please behave good to a artist like him, performing 4 hrs straight without break for audience. Be kind & enjoy the #Music...#ArijitSingh #ArijitSinghLive #Bollywood pic.twitter.com/34OIyszY9R
— Arijit Singh Fan (@SinghfanArijit) May 8, 2023
अरिजित सिंहचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक
कॉन्सर्टदरम्यान चाहत्यानं हात जोरात ओढला तरी अरिजितनं ती सिच्युएशन शांतपणे हँडल केली, त्याबद्दल अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अरिजित सिंहचं कौतुक केलं.
अरिजितच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. अनेक चित्रपटांमधील गाणी अरिजितनं गायली आहेत. 'फिर भी तुमको चाहूंगा', 'पछताओगे', 'पल', 'खैरियत', 'सोच ना सके', 'इलाही', 'हमारी अधुरी कहानी' या त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :