एक्स्प्लोर
'सुई धागा'मधील अनुष्काचे मीम्स सोशल मीडियावर वायरल
डोक्याला हात लावून बसलेल्या, हात उंचावून रडवेला चेहरा करणाऱ्या अनुष्काचे फोटो वेगवेगळ्या ठिकाणी क्रॉप करुन वायरल करण्यात आले आहेत
मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता वरुण धवन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'सुई धागा - मेड इन इंडिया' चित्रपटाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज झाला. ट्रेलरची जितकी चर्चा झाली नाही, त्याहून जास्त अनुष्काचे मीम्स सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.
डोक्याला हात लावून बसलेल्या, हात उंचावून रडवेला चेहरा करणाऱ्या अनुष्काचे फोटो वेगवेगळ्या ठिकाणी क्रॉप करुन वायरल करण्यात आले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर सध्या या वायरल फोटोंची चलती आहे. कल्पकता लढवून सोशल मीडियावर अनेक यूझर्सनी आपलं 'टॅलेंट' दाखवलं आहे.
'सुई धागा - मेड इन इंडिया'मध्ये वरुण धवन मध्य प्रदेशातील 'मौजी' या टेलरच्या भूमिकेत आहे, तर अनुष्का त्याची पत्नी ममताची व्यक्तिरेखा साकारत आहे. ममता ही कुशल एम्ब्रॉयडरी कारागीर आहे. दोघांनाही नॉन-ग्लॅमरस भूमिका साकारायची संधी मिळाली आहे. 28 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
पाहा काही मीम्स :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement